अक्काताई नेजे हायस्कूलच्या विद्यार्थिनींची शिष्यवृत्तीसाठी निवड







प्रेस मीडिया वृत्तसेवा : पृथ्वीराजसिंग राजपूत: 

दत्तवाड :- दत्तवाड तालुका शिरोळ येथील श्रीमती अक्काताई नाना ने जे हायस्कूल या विद्यालयाच्या इयत्ता आठवीतील दोन विद्यार्थिनी कु . स्वरांजली शशिकांत रजपूत  व कु . सायली अर्जुन धुमाळे   या विद्यार्थिनी एन एम एम एस ( राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना ) या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या . 

या विद्यार्थिनींना वार्षिक प्रत्येकी १२ हजार प्रमाणे चार वर्षे ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे . या यशस्वी विद्यार्थिनींना मुख्याध्यापक संजय तावदारे व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्यांचे प्रोत्साहन व पर्यवेक्षक डी ए पाटील , बाह्य परीक्षा विभाग प्रमुख एस.जे.पाटील व बी.बी.सावळवाडे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले . यावेळी या दोन्ही विद्यार्थिनींचे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post