प्रेस मीडिया वृत्तसेवा : पृथ्वीराजसिंग राजपूत :
दानोळी :-दानोळी कवठेसार रोड येथील जमादार यांच्या विहिरीत एक मगर आहे असे स्पष्ट दिसल्या नंतर, [WCRS] वाइल्ड लाईफ कंजर्वेशन रेस्क्यू सोसायटी जयसिंगपूर यांना जमादार यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांच्या विहिरीतून पाणी काढण्याची व्यवस्था केली. सकाळी सकाळी पहाटे 05:00 वाजण्याच्या सुमारास 6 फूट लांब मगर पकडण्यात आले. इंग्लिश मध्ये या मगरीला Nile crocodile असे म्हणून संबोधित केले जाते. सकाळी पहाटे पाचच्या सुमारास मगर रेस्क्यू करण्यात यश आले.
या प्रसंगी वाइल्ड लाईफ कंजर्वेशन रेस्क्यू सोसायटीचे अध्यक्ष सर अभिजीत खामकर,शुभम रास्ते,साई रसाळ,सचिन सुरवसे,शाहरुख मुजावर,निरंजन यादव,सुमित धोत्रे,दिलीप कांबळे,राम पडियार,दिवाकर तिवडे या सदस्याकडून रेस्क्यू करण्यात आले. या वेळी वन मजूर हरीभाऊ जाधव हे उपस्थित होते. सकाळी पहाटे सहाच्या सुमारास त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप पोहोचवण्यात आले.