सिद्धेश्वर कुस्ती मैदानांतील वृक्षांना ठिबकद्वारे पाणी व्यवस्था

 






 प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

विक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : 

बेडकिहाळ, ता,२४, येथील ऐतिहाशिक श्री सिद्धेश्वर कुस्ती मैदानांतिल आंतील परिसरात गेल्याच महिन्यात प पू सिद्धेश्वर स्वामीजी, (विजापूर ) व प पू अदृष्य काडसिद्धेश्वर स्वामीजी (कणेरी मठ) यांच्या उपस्तीत वृक्षारोपन करण्यात आले होते. सुमारे २५ झजाराच्या वर कुस्ती रसिक बसून सहज रित्या कुस्ती खेळाचा आस्वाद घेणाऱ्या या मैदानाच्या आंतील बाजूने सावलीदार ४१ झाडे लावण्यात आली आहेत. 

  तर वाढत असलेल्या झाडांची पाण्या वाचून परवड होऊनये म्हणून प्रत्येक झाडाला ठिबकद्वारे  पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले, तर ठिबक साठी येणारा सर्व खर्च  श्री विराचार्य अल्फ संख्यातर विविध उद्देशीय सहकारी संघाच्या सहकार्याने करणयात येत आहे. तर नजीकच आसलेल्या ग्राम पंचायतीच्या जलकुंभा द्वारे पाण्याची व्यवयस्था   करण्यात येणार आहे.  आशी ही माहिती मंगळवार ता,२४,रोजी या कामाच्या शुभारंभा प्रसंगी सिद्धेश्वर दसरा मोत्सव व कुस्ती कमिटीचे कार्यकर्ते सुनील नारे यांनी दिली.

    या प्रसंगी सुनील नारे  बोलताना  म्हणाले बेडकिहाळ च्या या ऐतिहासिक कुस्ती मैदानाच्या विकासासाठी भरीव अश्या योजना राबविण्यात येत असून, पूर्वेकडील बाजूने संवरक्षण भींत बांधणे, मुख्यतः आंतील लाल माती मैदानाची थोडी उंची वाढवणे, उतार  पद्धतीने स्टेपस करून घेणे, कुस्ती पैलवानांन साठी स्नान  गृह बांधून घेणे, आदी करून घेण्यात येत आहेत. त्या साठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 

    या प्रसंगी  कृषी पंडित सुरेश देसाई,  माजी जी प सदस्य अशोक आरगे,  ग्राम पंचायत सदस्य तात्यासाहेब केस्ते, कमिटीचे सदस्य शिवाप्पा सुभेदार, मलगौडा पाटील, विलास थरकार, बाबुराव खरात,  अशोक सुभेदार, बाबुराव धड्ड पाटील, व विक्रम शिंगाडे, कुमार माळगे, तानु सनदी आदी उपस्तीत होते..

Post a Comment

Previous Post Next Post