सौ.वृषाली प्रशांत साळी यांना चेन्नई युनिव्हर्सिटी कडुन डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

   सौ. व्रुषाली साळी या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ईंडीयण इंपायर डवलपमेंट चेन्नई युनिव्हर्सिटी तमिळनाडू यांच्या कडुन सामाजिक व उधोजक कार्याची दखल घेऊन  त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. त्या कार्यक्रमामध्ये डॉ.सी.पौल ईबनेजर, व्हाइस चेअरमन डॉ. प्रभाकर, फिल्म स्टार सुमन तळवार, डॉ. के.ए.मनोहरंम माजी आमदार तमिळनाडू हे उपस्थित होते. हा कार्यक्रम दि- 27 रोजी सकाळी 11 वाजता आंतरराष्ट्रीय क्लारिस्टा हॉटेल हॉल, तमिळनाडू  मध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, गोवा अशा अनेक राज्यांतुन डॉक्टरेट पदवीसाठी निवड करण्यात आली होती.



सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. ओंकार ऐश्वर्य एज्युकेशन ट्रस्टच्या, संस्थापक अध्यक्षा व लॉर्ड जिव्हेश्वर इंग्लिश मेडीयम स्कुल अॅड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी  याच्या प्रिंसीपल म्हणून कार्यरित आहे. तसेच त्यांना अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते त्यांना सावित्रीबाई फुले या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची डॉक्टरेट पदवीसाठी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अनेक क्षेत्रातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





Post a Comment

Previous Post Next Post