वायरमन,सुरज बेरड यांना उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी पुरस्काराने सन्मानित.






प्रेस मीडिया वृत्तसेवा : अकिवाट : 

         अकिवाट येथील  सुरज बेरड यांना कोल्हापुर परिमंडळ अंतर्गत, जयसिंगपुर डिव्हिजन मार्फत उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी म्हणुन पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आला.हे पुरस्कार मिळविण्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपुर्ण डिव्हिजन मधुन फक्त सहा वायरमन निवड करणेत आले होते.त्यातील  कुरुंदवाड सब डिव्हिजन मधून  सुरज बेरड यांनी महापुर परिस्थितीत केलेल्या उत्तम नियोजन व कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.हा पुरस्कार महावितरण च्या जयसिंगपूर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता - मकरंद आवळेकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता-प्रकाश तोवर व वरिष्ठ लिपिक शिरसाळे यांच्या उपस्थितीत जयसिंगपूर येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.

       पुरस्कार मिळाल्याची माहिती समजताच अकिवाट येथील जिल्हा परिषद शाळा नंबर ३ चे मुख्याध्यापक - खंडागळे,शांतिनाथ पाटील-शिरगांवे व रमेशकुमार मिठारे यांनी शाळेच्या वतीने सुरज बेरड यांना शाल, श्रीफळ व  पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Post a Comment

Previous Post Next Post