प्रेस मीडिया वृत्तसेवा :
'मराठा समाजाचे ओबीसी कारण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण या मागणीसाठी जयसिंगपूरात राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव संभाजी ब्रिगेड लढा उभारणार. डॉ.विकास पाटील ,जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड , कोल्हापूर. यांनी सांगीतले.
१) मराठा समाजाचे ओबीसी करण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करावे.
२) सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच्या मराठा समाजातील नोकरीस पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या तात्काळ द्याव्यात.
३) मराठा समाजातील विद्याथ्र्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करावे.
४) सर्व समाज घटकांची जातनिहाय जनगणना करावी.
१) मराठा समाजाचे एस.ई.बी.सी. चे राज्य सरकारने दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलेले आहे. त्यामुळे मराठा समाजात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. तीस वर्षापासून मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा , यासाठी संघर्ष सुरू आहे. सर्व संवैधानिक आयोग व सरकारकडे त्याचा पाठपुरावा करीत आहोत परंतु आघाडी व युती सरकारांनी नेहमीच आरक्षणाबाबत मराठा समाजाची फसवणूक केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप शिवसेना यांच्या सरकारांनी संवैधानिक टिकणारे आरक्षण मराठा समाजाला पात्र असूनही दिले नाही , उलट ई एस बी सी व एस ई बी सी चा गोंधळ घालून मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे. सुप्रीम कोर्टाने ते आता पूर्णतः रद्द केलेले आहे. त्यामुळे मराठा तरुणांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झाले असून बहुजन समाजाचा घटक असलेल्या मराठा समाजाला एकाकी पाडण्याचा हा कुटील डाव संभाजी ब्रिगेड उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवराय ,फुले ,शाहू , आंबेडकर या विचारावर संभाजी ब्रिगेड वाटचाल करीत आहे. कुणबी मराठा ओबीसीसह सर्व बहुजन समाजाला एकत्रित करणे व एकसंघ ठेवणे आणि त्यांचा प्रश्न सोडवणे ,ही भूमिका आहे. राजर्षी शाहू महाराजांनी ज्या उद्दिष्टांसाठी आरक्षण दिले होते , त्या मूळ विचारांनाच तिलांजली दिली जात आहे . ओबीसीच्या आरक्षणा बाबतही असुरक्षितता निर्माण झाली असून देशातील संविधानाने दिलेले आरक्षण टप्पाटप्प्याने रद्द करण्याचा आरएसएस व भाजपा चा कुटील डाव आहे . बहुजनांनी आपसात भांडण्यापेक्षा एकत्रित संघर्ष करण्याची गरज आहे. मराठा समाज मागास असून कुणबी मराठा एकच आहेत ,त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवून ओबीसीचे संरक्षण करणे गरजेचेच आहे यासाठी संभाजी ब्रिगेड देशव्यापी लढा उभारणार आहे.
२) मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झालेले आहे व महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे. त्याचा निकाल कधी येईल काही सांगता येत नाही ,राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी टाळू नये , यात राज्य सरकार व केंद्र सरकारने पुढाकार घेऊन हा प्रश्न त्वरित सोडवावा , राज्य सरकारने तोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी च्या सवलती द्याव्यात. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वीच्या मराठा समाजातील नोकरीस पात्र उमेदवारांच्या जाणीवपूर्वक रखडवलेल्या नियुक्त्या तात्काळ द्याव्यात. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करावे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट न बघता महाराष्ट्र सरकारने तात्काळ विशेष अधिवेशन भरवून महामाहीम राज्यपाल यांच्यामार्फत मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा ,यासाठी शिफारस केंद्र सरकारला करावी. सर्व समाज घटकांची जातनिहाय जनगणना करावी व आरक्षणाचा प्रश्न कायमचा सोडवावा.
या मागण्यांचे निवेदन नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना देण्यात आले , तसेच संभाजी ब्रिगेडच्या लेटर पॅडवर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून शपथपत्रही लिहून घेतले .
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. विकास पाटील, उपाध्यक्ष नेताजी बुवा, कार्याध्यक्ष भगवान कोईगडे, शिरोळ तालुकाध्यक्ष अक्षय पाटील, चंद्रकांत जाधव ,बजरंग खामकर, शैलेश आडके,इकबाल बैरागदार, आकाश खोत विद्यानंद पाटील , रणजित देवणे , संजय भोसले ,विक्रम खराडे , मनोज पाटील ,सागर चौगुले, राहुल पाटील ,नंदू कदम,अशोक घोरपडे, शशिकांत देसाई, अमित पाटील ,इकबाल सुदरणे यांच्यासह शिरोळ ,हातकणंगले तालुक्यासह जिल्हयातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.