शिरोळ-
गुरुवार पासून धरण क्षेत्रासह सर्वच भागात पडत असलेला प्रचंड पाऊस त्याचबरोबर सर्व धरणांमधून होणारा पाण्याचा मोठ्या प्रमाणातील विसर्ग यामुळे कृष्णा, पंचगंगा व वारणा या नद्यांसह सर्व नद्यांच्या पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ होत आहे ज्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे तो पाहता 2019 ची महापूराची पुनरावृत्ती कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात अटळ असल्याचे जाणवत आहे, अलमट्टी मधून विसर्ग वाढवावा याबाबत आपण कर्नाटक सरकारच्या प्रतिनिधीशी बोललो असून त्यांच्याशी सातत्याने संपर्क सुरू आहे, सध्या अलमट्टी धरणांमधून मधून अडीच लाख क्युसेक्स ने सुरु असलेला विसर्ग तीन लाखापर्यंत वाढवण्याचे त्यांनी मान्य केले आहे,
या तांत्रिक गोष्टी जरी असल्या तरीही पावसाचे प्रमाण पाहता शुक्रवारी रात्री नंतर नदीपात्रांमध्ये पाणी पातळी ची वाढ वेगाने होईल त्यामुळे गावचा संपर्क तुटण्या आधी शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या परिवारासह पशुधन सोबत घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले, मंत्री यड्रावकर यांनी शुक्रवारी सकाळपासूनच शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती बाबत संवेदनशील असलेल्या शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावांना भेट देऊन तेथील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना आधार दिला ग्रामसेवक, तलाठी, वीज मंडळाचे कर्मचारी व अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रा कडील कर्मचारी,पशुवैद्यकीय व कृषी अधिकारी गावांमध्ये सेवेत असणाऱ्या या सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या, संभाव्य संकटाबाबत नागरिकांना सहकार्य करण्याचे आदेश दिले, कुरुंदवाड एसटी मंडळाचे आगार प्रमुख श्री शिंदे यांना नागरिकांच्या स्थलांतरासाठी एस टी च्या बारा गाड्या तातडीने तयार ठेवाव्यात असे आदेश दिले, त्याच बरोबर 2019 प्रमाणे शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजच्या बसेस सुद्धा तयार ठेवण्याचे आदेश राज्यमंत्री यड्रावकर यांनी कॉलेज प्रशासनाला दिले, त्याचप्रमाणे नागरिकांच्या पशुधनासाठी(जनावरांसाठी) कुरुंदवाड येथील पार्वती सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर व्यवस्था करण्याबाबत सूचना दिल्या असल्याचेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले, परिस्थिती गंभीर झाल्यास नदीपलीकडील सात गावातील स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी लालबहादूर शास्त्री विद्यालय कवठेगुलंद त्याचप्रमाणे कागवाड येथील बाबनगोंडा विद्यालयात व्यवस्था केली असल्याचे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले, शिरोळ साठी शनिवारी सकाळपर्यंत भारतीय सैन्य दलाचे साठ जणांचे पथक शिरोळ मध्ये दाखल होत असून एनडीआरएफच्या आणखी दोन तुकड्या शिरोळ साठी उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना आपण जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांना दिले असल्याचेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले आहे, शुक्रवारच्या तालुका दौऱ्यादरम्यान कुरुंदवाड नगरपरिषदेला सुद्धा राज्यमंत्री यड्रावकर यांनी भेट दिली नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्यासह उपस्थित नगरसेवक मुख्याधिकारी व पालिकेच्या अधिकाऱ्यांचीही संभाव्य पूर परिस्थिती बाबत सविस्तर चर्चा करून अधिकार्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. महामुनी व पोलीस निरीक्षक श्री. निरवडे उपस्थित होते,
शुक्रवारची रात्र आणि शनिवारचा दिवस म्हणजे येणारे 48 तास सर्वांसाठी महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे आणि तातडीने स्थलांतरित व्हावे असे आवाहनही त्यांनी गावागांवाच्य भेटी दरम्यान केले, या वेळी प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, गट विकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.