इचलकरंजी शहर सहनियत्रंण समितीचा दुकाने चालु ठेवण्याचा ठराव शासनाकडे पाठवला - नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी



प्रेस मीडिया वृत्तसेवा

प्रतिनिधी :

इचलकरंजी, ता.६  शहरातील जून व जुलै महिन्यातील पाॅझीटीव्ह रेट १० टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे दुकाने सुरु करण्याबाबतचा ठराव आज झालेल्या शहर सनियंत्रण समतिच्या बैठकीत करण्यात आला. नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हा ठराव तातडीने राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. त्यामुळे शहरातील दुकाने सुरु करण्याच्या प्रक्रीयेला गती आली आहे. लवकरच कोल्हापूरच्या धर्तीवर शहरातील दुकाने सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे.

कोल्हापूर शहरात सर्व प्रकारची दुकाने सुरु झाली आहेत. मात्र इचलकरंजीला या निर्णयात डावलण्यात आल्यांने आज त्याचे जोरदार पडसाद विविध स्तरावर उमटले. सोशल माध्यमातूनही याबाबत विविध प्रश्न विचारण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर आज पालिकेत शहर सनियंत्रण समितीची बैठक झाली. त्यामध्ये दुकाने सुरु करण्याचा ठराव एकमतांने करण्यात आला. उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी त्यावर सूचक म्हणून तर शशांक बावचकर यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. हा ठराव तातडीने शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

शहरात सद्या कोरोना संसर्ग नियंत्रणात येत आहे. २० जून ते ४ जुलै याकालावधीत आरटीपीसीआरचा पाॅझीटीव्ह रेट ८.०५ टक्के तर अॅन्टीजेन टेस्टचा ५ जून ते ४ जुलै या कालावधीतील पाॅझीटीव्ह रेट २.५ टक्के इतका आहे. सद्या शासनाने १० टक्के कमी पाॅझीटीव्ह रेट असलेल्या जिल्ह्यात लाॅकडाऊनमध्ये शिथीलता दिली आहे. त्यानुसार इचलकरंजी शहरातील पाॅझीटीव्ह रेट कमी असल्यामुळे दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे ठरावात नमूद केले आहे. यामुळे कोल्हापूरप्रमाणे इचलकरंजीतील दुकानेही लवकरच सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post