प्रेस मीडिया वृत्तसेवा :
जनतेची आर्थिक लूट होताना विरोधी पक्ष गप्प का?
पिंपरी चिंचवड शहरामध्ये जनतेचा व अनेक नगरसेवकांचा अंतर्गत विरोध जुगारून सत्ताधारी भाजप व विरोधी पक्षाच्या मिलीभगतीने पे अँड पार्किंग धोरण लागू केले . राज्यकर्त्यांच्या या मनमानी मुळे सामान्य जनता होरपळून निघत आहे. *पे अँड पार्किंग धोरणाचा परिणाम इंडस्ट्रियल कामगार , नोकरदार महिला , सेल्समन , झोमोटो सारख्या ठिकाणी काम करणारे कामगार , अपंग नागरिक, विधवा व निराधार महिला ,टुरिस्ट काम करणारे वाहनचालक यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. यामुळे अपना वतन संघटनेच्या वतीने १५ जुलै २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. आयुक्त राजेश पाटील , महापौर उषाताई ढोरे , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके ,विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यासहित शहराचे भाजपचे अध्यक्ष व आमदार मा. महेश लांडगे , आमदार लक्ष्मण जगताप या सर्वाना लेखी निवेदन देऊन पे अँड पार्किंग धोरण रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु *याबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षांनी कसलीही दखल घेतली नाही. त्यामुळे अपना वतन संघटनेच्या वतीने सर्वच राजकीय पक्षांच्या जबाबदार लोकप्रतिनिधींना याबाबत जाब विचारण्यासाठी त्यांच्या स्थानिक कार्यालयावर आंदोलने सुरु केली आहेत. यामाध्यमातून सामान्य जनतेचा आवाज या लोकप्रतिनिधी पर्यंत पोहचविण्याचा व पे अँड पार्किंग चे चुकीचे धोरण समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या वतीने शनिवार दि. ३१ जुलै २०२१ रोजी सकाळी ११. ३० वा , विरोधी पक्षनेते मा. राजू मिसाळ यांचे जनसंपर्क कार्यालय , सेक्टर २६, आकुर्डी रेल्वे स्टेशन , प्राधिकरण या ठिकाणी पे अँड पार्किंग च्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. पे अँड पार्किंग धोरण रद्द करण्याची मागणी सर्व नागरसेवकां सहित विरोधी पक्षांनी प्रशासनाकडे लावून धरावी व सभागृहात विरोध करावा. यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
मा. सिद्दीकभाई शेख ,
*संस्थापक ,अध्यक्ष ,अपना वतन संघटना*
*मो. ९६६५४८४७८६*