लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे योगदान मोलाचे : जि प सदस्य अरून इंगवले.



हातकणंगले तालुका  प्रतिनीधी : आप्पासाहेब भोसले

         समाजातील वंचित सर्वच स्तरातील कामगारांना लालबावटा बांधकाम कामगार संघटनेने आधार दिला असून संघटनेचे कामगारांबद्दलचे योगदान मोलाचे आहे असे जि प सदस्य अरून इंगवले म्हणाले ते हातकणंगले येथे लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या नूतन ऑफीस व मध्यान्ह भोजन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते . यावेळी त्यांनी संघटनेच्या कार्याचे कौतूक केले .

           यावेळी माजी आमदार व गोकुळचे नुतन संचालक म्हणाले महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्यासाठी मंडळ स्थापन करून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याच्या कल्याणकारी योजना तयार करून बांधकाम कामगारांना प्रत्यक्षात लाभ देण्यास सुरुवात केली आहे, त्याचा लाभ सर्व कामगारानी घ्यावा असे अवाहन केले. 

             यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. भरमा कांबळे म्हणाले लाल बावटा संघटनेने राज्य सरकारशी संघर्ष करून बांधकाम कामगारांचे मंडळ स्थापन करण्यास भाग पाडले. मंडळाने महापुरामध्ये ज्या बांधकाम कामगारांची घरे पडलेली आहेत त्यांना विनाविलंब घरासाठी ५ लाख रुपये अर्थसाह्य करावे, व ज्या बांधकाम कामगारांच्या घरामध्ये महापुराचे पाणी आलेले आहे त्यांना ५० हजाराची तात्काळ मदत करावी अशी मागणी केली. 

            यावेळी जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम , कॉ. विजय कांबळे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत , शासकीय योजना कामगारांपर्यत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगीतले .नूतन ऑफीसचे उद्घाटन माजी आम.डॉ . सुजित मिणचेकर यांच्या हस्ते तर मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ नगरसेवक राजू इंगवले यांच्या हस्ते करण्यात आले.

             कार्यक्रमास पोलिस निरीक्षक के एन पाटील , संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ संदीप सुतार,रमेश निर्मळे, नुरमहंमद बेळकुडे, शिवाजी कांबळे हंनजय पाटील कुमार कागले आप्पा कोठावळे गणेश खोडे प्रकाश पाटील, उपनगराध्यक्षा उपाध्ये , नगरसेवक केतन कांबळे , रणजित पाटील, शिवसेना शहराध्यक्ष धोंडीराम कोरवी , संदीप कांबळे , बाबासाहेब कांबळे , राजेद्र कांबळे उपस्तीत होते .

Post a Comment

Previous Post Next Post