हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले इचलकरंजी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आज महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय इचलकरंजी येथे घेण्यात आली यावेळी बांधकाम कामगाराच्या विविध विषयांबाबत प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या हातकणंगले तालुका सरचिटणीस पदी वठार ग्रामपंचायत सदस्य जावेद पाथरवट यांची तर हातकणंगले तालुका उपाध्यक्ष पदी किणीचे इम्तियाज शेख यांची निवड करण्यात आली सदर निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र निकम जिल्हा अध्यक्ष सद्दाम मुजावर जिल्हा उपाध्यक्ष केप्पाना हालगेकर जिल्हा सचिव राहुल दवडते यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी संघटनेचे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष अल्ताफ नाईकवाडे बादल हेगडे यांच्या सह इतर पदाधिकारी उपस्थित होते
Tags
Latest