पृथ्वीराजसिंग राजपूत :
दत्तवाड:- (ता) शिरोळ या ठिकाणी असणाऱ्या ग्रामीण रुग्णालया मधील डॉक्टर्स व नर्स यांना पुष्पगुच्छ, मास्क देऊन सन्मानित करण्यात आले. एक जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सध्या कोरोच्या महामारी मध्ये डॉक्टरांची भूमिका ही महत्वाची आहे. कोरोणा सारख्या महामारी मध्ये आपल्या कुटुंबाची काळजी न करता प्रशासनासोबत डॉक्टर्स सुद्धा दिवस-रात्र झटत आहेत. त्यांच्या या कार्याबद्द्ल डॉक्टर्स डे च्या निमित्ताने दत्तवाड-घोसरवाड पत्रकार संघातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. शिलवर्धन चिपरीकर, नर्स अंकिता लठ्ठे, शितल मिसाळ, बाळासाहेब कोकणे, संजय कोकणे, इसाक नदाफ, मिलिंद देशपांडे, जहांगीर रणमल्ली, आकाश फडतारे, शितल कांबळे, उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक भूपाल मुगळे यांनी तर आभार संजय फडतारे यांनी मानले.