प्रेस मीडिया वृत्तसेवा :
वाघोली : वाघोली सह २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना बुधवारी (दि.३०) जारी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेने ग्रामपंचायतीचा ताबा घेतला.
महापालिकेचे उपायुक्त सुहास जगताप व त्यांचे पथक सकाळी महापालिकेकडे ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांचे हस्तांतरण करण्यासाठी उपस्थित राहिले होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची व ग्रामपंचायत संबंधित कागदपत्रांची माहिती घेऊन काही दप्तर, शिक्के जमा करून घेतले.
नवीन नोंदी तसेच इतर व्यवहार करण्यावर निर्बंध आणले आहेत. संगणकीकरण तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना प्रशिक्षण पुढील दिवसांमध्ये दिले जाणार आहे. ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.वाघोली तालुका हवेली येथील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या सर्व उपक्रमांमध्ये वेळोवेळी सहभाग घेऊन ग्रामपंचायतीला अनमोल असे सहकार्य केले आहे. त्याबद्दल सर्व नागरिकांचे आभार.