ओमकार पाखरे :
तेरवाड ( ता: शिरोळ): येथील गावातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने दोन दिवसांत सत्तावीस जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने शनिवार - रविवार दोन दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.
तेरवाड गावात पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान ११६ रुग्णांची नोंद झाली आहे. सात जण मयत झाले आहेत. ८२ जण उपचार घेवून बरे झाले आहेत. २७ जण उपचार घेत आहेत.
ग्रामपंचायत प्रशासनाने घर ते घर आर. टी. पी.सी.आर तपासणी केली असता दोन दिवसांत सत्तावीस जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला असून प्रशासनाने रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण गावात शनिवारी - रविवारी कडक लॉकडाऊन लागू केला आहे.
संपूर्ण ग्रामस्थांची आर. टी. पी.सी.आर तपासणी सुरू केलेली असून ४६७ जणांची तपासणी केलेली असून सोमवारी यांचा अहवाल प्राप्त होणार आहे.
सरपंच लक्ष्मीबाई तराळ, उपसरंच जालंदर सांडगे, ग्रामविकास अधिकारी अवधूत रेळेकर यांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, कोरोनची लक्षणे आढळताच तत्काळ रूग्णाल्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.