प्रेस मीडिया वृत्तसेवा :
टाकळीवाडी येथे सांस्कृतिक हॉल पायाभरणी शुभारंभ प्रसंगी काढले उदगार.
टाकळीवाडी-
मागील दीड पावणे दोन वर्षात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर साहेब यांच्या योगदानातून शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला गेला असल्याने सुरू असलेल्या गावागावातील या कामांमुळे शिरोळ तालुक्याचा चेहरामोहरा बदलतो आहे असे उदगार युवा नेते आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर साहेब यांच्या सहकार्यातून क वर्ग तीर्थक्षेत्र विकास निधीतून टाकळीवाडी येथे रेणुका मंदिर सांस्कृतिक हॉल उभारणीचा पायाभरणी शुभारंभ शुक्रवारी संपन्न झाला यावेळी ते बोलत होते पंचायत समितीच्या सभापती सौ. दिपाली परीट प्रमुख उपस्थित होत्या,
जात -पात, पक्ष, संघटना, गट- गट असा भेदभाव न करता शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावाला समप्रमाणात विकास कामांसाठी निधी देण्याची भूमिका राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर साहेब यांनी सुरुवातीपासून घेतली आहे, त्यामुळे तालुक्यातील सर्व गावात त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांना सुरुवात झालेली आहे काही गावांमध्ये ती पूर्ण सुद्धा झालेली आहेत,
या पुढच्या काळात सुद्धा सर्वांना बरोबर व विश्वासात घेऊन शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकारले जाईल असेही शेवटी आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी म्हंटले आहे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी टाकळीवाडी साठी दिलेल्या या निधीबद्दल टाकळीवाडीच्या सरपंच सौ. मंगला बिरनगे,उपसरपंच भरत पाटील ग्रामपंचायत सदस्य तुकाराम चिगरे, बाजीराव गोरे, अमोल गोरवाडे, वसंत गोरे, यांनी आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा सन्मान केला,
या शुभारंभ प्रसंगी गणपती चिगरे, धनपाल कोथळी, सुनील चिगरे, राजू ऊगारे, बाळासो पाटील, अमोल चिगरे, सागर चिगरे, खुशाल कांबळे, बापू कोळी, बाबासो वनकोरे, नरसगोंडा पाटील, मिथुन गोरवडे, अतिश चव्हाण, जयंत सलगरे,पि.मो. जमादार, रमेश बिरनगे, भीमू भमाने, वासुदेव खोत यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते,