ओमकार पाखरे :
शिरोळ - शिरोळ तालुक्यातील युवक, युवतीना, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक शनिवारी रोजगार मेळावा घेण्यात येत आहे. तालुक्यातील युवकानी या रोजगार मेळाव्याच्या संधीचे सोने करून घ्यावे. जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळावा हाच फाउंडेशनचा उद्देश आहे. स्थानिक उद्योजकांनी स्थानिक तरुणांनाच रोजगाराची संधी उलब्ध करून द्यावी, असे आवाहन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन व उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.
कवठेगुलंद ( ता: शिरोळ) येथील लालबहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याप्रसंगी बोलत होते. आलास, बुबनाळ, शेडशाळ, गणेशवाडी, कवठेगुलंद, औरवाड, व गौरवाड या गावामधील दहावी, बारावी, आयटीआय, पदवीदर, व डिप्लोमा धारक युवकांची रोजगाराची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न म्हणून या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी एकूण ८४ युवक - युवतींची नोकरीसाठी निवड झाली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिप प्रज्वलन झाले. विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कंपनीमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी, पगार व अनुभवा संदर्भात मार्गदर्शन केले.रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात फाउंडेशनचे उपाध्यक्ष सर्जेराव पवार, शिरोळ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, अविनाश कदम, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गणपतराव पाटील यांनी युवकांना शेती करणे गरजेचीच आहे असे सांगून, ज्यांना शेती नाही अशा युवकांसाठी त्यांची रोजगार समस्या सोडविण्यासाठी फाउंडेशन आगामी काळातही कार्यरत राहील. त्यांनी मुलाखत चांगली देवून निवड कशी होईल याकडे लक्ष द्यावे, असे सांगितले. विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. एकूण ८४ युवक - युवतींची नोकरीसाठी निवड झाली. त्यामध्ये इंडो काउंट कागल- १०, सिग्रेट इंडस्ट्रीज- ६, प्रिकॉल सातारा- ३, कृषी भरारी- २, रॉयल सीएनसी- २, सानिका टेक्नॉलॉजी- १०, रेमंड- २, सन ऑटो- ८, काकडे इंडस्ट्रीज कागल - ७, सन्मती कॉम्पोनंट- २०, सरोज इंडस्ट्रीज- ५, श्रीम इलेक्ट्रिक कंपनीमध्ये - ९ अशा एकूण ८४ युवक - युवतींचा समावेश आहे.
यावेळी दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील, प्लेसमेंट ऑपिसर दिपाली भंडारे, प्रा. मोहन पाटील, दीपक कांबळे, अशोक पाटील, अनिल महाजन, मुजम्मील पठाण, आबा मगदूम, अस्लम मखमुल्ला, सुभाष शहापूरे, संजय गुरव, आबा गाताडे, सरपंच गजानन चौगुले, नगरसेवक विठ्ठल पाटील, संदीप शिंदे, अवधूत भेंडवडे, प्रशांत भेंडवडे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, युवती, मान्यवर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कालगी, यांनी केले तर आभार फैसल पटेल यांनी मानले.