एम आय डी सी तील ओटर कंट्रोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला.

 




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे : एम आय डी सी तील ओटर कंट्रोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला.कंपनी तर्फे त्यांच्या सर्व कामगारांना आणि त्याच्या कुटुंबियांना मोफत लस देण्यात आली.

                  हा कार्यक्रम कंपनीतील उत्सव कमिटीने अतिशय शिस्तबद्ध पद्धीतीने पूर्ण केला.सर्वांना नोंदणीकरणासाठी एक दिवस प्रशिक्षण  दिले आणि त्यांच्याकडून नोंदणी करून घेतली ज्यामुळे कामगारांचा  आणि लसीकरण करणाऱ्यां टीम चा खूप वेळ वाचला. लसीकरण करण्यापूर्वी सर्वांना न्याहारी देण्यात आली आणि वातानुकूलित परिसरात लस घेणाऱ्या प्रत्येकाला निरीक्षण कक्ष तयार करून त्यांची विशेष व्यवस्था  केली.लस घेतल्यावर ताप येतो ह्याकरिता डॉक्टरांच्या  सल्ल्यानुसार लागणारे औषध सुद्धा कंपनीने सर्वांना मोफत वाटप केले.

             सर्व कामगारांना विश्राम मिळावा म्हणून यात कंपनीचे M.D सर श्री.उल्लास जोशी, कंपनीचे CFO सर श्री. गौरव जैन, कंपनीचे Plant Head सर श्री. गणेश मुळे आणि   कंपनीचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख सर श्री. अक्षय देव्हारे यांनी दुसऱ्यादिवशी कंपनीत पूर्ण सुट्टी जाहीर केली.कंपनीतील सर्व कामगारांनी त्याच्या संचालक  व .व्यवस्थापनाचे विशेष आभार मानले.

सध्याच्या कोरोनाकाळात कंपनीने दिलेली हि सर्वात मोठी भेट आहे असे कामगारानी मनोगत व्यक्त केले.यात ओटर कंपनीचे सहकारी श्री.वैभव पाटील, संदीप देशमुख,कुणाला देशमुख, तानाजी कावठाळे, तुषार जठार, अमोल भोसले, मनीषा वाळुंज आणि ज्योत्स्ना गुंजाळ यांनी या पूर्ण लसीकरणाचे पहिल्या पासून तर शेवट पर्यंत पद्धतशीर नियोजन केले. त्याबद्दल कंपनीने त्यांचे विशेष आभार मानले.


जाहिरात व बातम्या साठी संपर्क : 

Pressmedia05@gmail.com.


Post a Comment

Previous Post Next Post