प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : एका महिलेकडून पाच लाख 75 हजार रुपये घेऊन ते परत न करता आर्थिक फसवणूक करून विश्वासघात केला पीडित महिलेने पैसे मागितल्यावर आरोपींनी पैसे परत न करता तिला जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या चा प्रकार पुणे उघडीस आलेला आहे शहरातील समर्थ पोलीस स्टेशन च्या हद्दीत उघडीस आलेला आहे या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशन मध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सुरेश सुब्राव भालेराव व इतर तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी फिर्यादी पीडित महिलेने यांनी समर्थ पोलीस स्टेशन मध्ये लेखी तक्रार दाखल केली होती परंतु संबंधित पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याने फिर्यादी महिलेने अँड साजिद ब. शहा यांच्यामार्फत मेहरबान कोर्टात प्रायव्हेट तक्रार दाखल केली होती मे. कोटाने समर्थ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश केले आहे.. त्यानुसार समर्थ पोलीस स्टेशन मध्ये आरोपींवर भा. द. वी. कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार मार्च 2014 ते 2021 या कालावधीत नाना पेठेत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहणार असून तसेच एकमेकांचे ओळखीचे आहेत. भालेराव कुटुंबाने फिर्यादी ची आई यांचा विश्वास संपादन केला त्यांच्याकडून पाच लाख 75 हजार रुपये घेऊन सहा महिन्यात परत करण्याचे आश्वासन दिले होते परंतु मुदत संपून गेल्यानंतर देखिल आरोपींनी फिर्यादीचे पैसे परत केले नाही भालेराव कुटुंबाने फिर्यादी यांचे पैसे देण्यास नकार दिला तसेच फिर्यादी व फिर्यादीच्या आईला जीवे ठार मारण्याच्या वेळोवेळी धमक्या दिल्या याप्रकरणी तक्रारदार यांनी एडवोकेट साजिद ब.शहा व एडवोकेट एच एच खान यांच्यामार्फत मे. न्यायालयात दाद मागितली होती.
कोर्टाच्या आदेशानुसार समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर प्रकरणात फिर्यादी तर्फे एडवोकेट साजिद ब शहा व एडवोकेट एच एच खान हे काम पाहत आहे...