प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : लोकजनशक्ती पार्टी तर्फे भर पावसात २३ जुलै रोजी ‘माझे रेशन, माझा अधिकार ‘ धरणे आंदोलन करण्यात आले.
विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता हे आंदोलन करण्यात आले. लोकजनशक्ती पार्टी, पुणे शहर -जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण मोफत अन्न योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या जिल्हा व पुणे शहर पुरवठा अधिकारी, परिमंडल अधिकारी, पुरवठा तहसिलदार यांची चौकशी करावी, या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. रेशन चे वितरण गरजू पर्यंत न होता त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा पक्षाचा आरोप असून एक वर्षापासून आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा चालू असल्याचे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.