पतीवर पत्नीकडून जीवघेणा हल्ला करून बेकायदेशीरपणे घरात कोंडून ठेवले व पाच लाख रुपयांची मागणी करून घटस्फोटासाठी दबाव टाकला....



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 पुणे कोंढवा येथे  इरफान सय्यद नावाच्या व्यक्तीवर त्याच्या पत्नीने  जीवघेणा हल्ला केला व दोन दिवस पर्यंत घरात कोंडून ठेवले असा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे.  

 इरफान सय्यद यांच्या पत्नीने व तिच्या नातेवाईकांनी इरफान सय्यद यांना दिनांक 19/7 2019 रोजी घरात  बेकायदेशीरपणे कोंडून ठेवले तसेच दोन दिवस उपाशी ठेवून त्याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली त्याला बेदम मारहाण केली त्याच्या हाताचा अंगठा मोडला पोटात मुकामार मारून पत्नीने पोटात खुर्ची मारून फेकली  इरफान सय्यद यांनी वाचवा वाचवा हेल्प हेल्प असे   मदतीसाठी  विनंती केली असता  सोसायटीच्या मालकाने वाचमेन  व  आजूबाजूच्या लोकांनी फिर्यादी यांच्या जीव वाचविला व पत्नी च्या तावडीतून पतीची सुटका केली  फिर्यादी इरफान सय्यद यांनी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊन देखील पोलिसांनी आरोपी महिलेवर काहीही कारवाई केली नाही म्हणून फिर्यादी इरफान सय्यद यांनी एडवोकेट साजिद ब शाह व एडवोकेट एच एच खान यांच्यामार्फत कोंढवा पोलीस स्टेशन तसेच पुणे पोलीस आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी पुणे माननीय  पोलीस महासंचालक मुंबई, गृह सचिव मंत्रालय मुंबई यांना लेखी स्वरुपात तक्रारी दिल्या  फिर्यादी इरफान सय्यद  हे सध्या अत्यंत दहशत व भीती मध्ये आहेत तसेच त्यांच्यावर उपचार देखील शुरू आहे. फिर्यादी यांना न्याय मिळणे साठी वकील साजिद ब शाह व एच एच खान हे काम पाहत आहे....

Post a Comment

Previous Post Next Post