प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे :पिगॅसिस पाळत प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महाराष्ट्रातील टेलिफोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी या प्रकरणातील तक्रारदार ॲड सतिश उके यांनी केली आहे . या प्रकरणात यापूर्वी चौकशीचे आदेश नागपूर न्यायालयाने दिलेले होते.
ॲड सतिश उके यांनी या संदर्भात आज पत्रक प्रसिद्धीस देऊन ही मागणी केली आहे.
ॲड सतिश उके यांनी अजनी नागपुर पोलीस स्टेशन येथे डिसेंबर 2020 मध्ये तक्रार केली होती. ऍड उके यांनाही आपला फोन नंबर निगराणी खाली असून धमक्या येत होत्या म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती. आणि न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते उके यांनी फडणवीस यांच्या स्वीय सहाय्यक आणि ओ एस डी म्हणून काम करत असलेल्या निधी कामदार यांच्या आणि कौस्तुभ ढवसे यांच्या चौकशीची मागणी केली होती. फडणवीस यांच्या कार्य काळात ब्रिजेश सिंग यांच्या अधीपत्या खालील माहिती -जनसंपर्क खात्या मार्फत पाळत ठेवण्यात येत होती. पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला, हेमराज बागुल असे अधिकारी हे काम करत होते. त्यातील अनेकांनी परदेशात प्रशिक्षण घेतले होते. नाना पटोले यांच्या सहित काही न्यायमूर्तींचे फोन देखील टॅप झाले आहेत., असे ऍड उके यांनी सांगितले. फडणवीस यांच्या कार्यकाळात परदेश दौरे करणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी व्हावी असे पिगॅसिस प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ऍड उके यांनी मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस कोणाकोणावर पाळत ठेवत होते, त्यांचा हेतू काय होता हे स्पष्ट होईल, असेही अॅड. उके यांनी म्हटले आहे.