प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : महिला पोलिस उपायुक्तांची 'फुकट बिर्याणी'ची ऑडिओ क्लिप सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना चाैकशीचे आदेश दिले आहेत.पाेलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची एक कथित ऑडिओ क्लिप शहरात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये त्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला एका हाॅटेलमधून बिर्याणी आणि प्राॅन्स माेफत घेऊन घरी पाठविण्यास सांगत असल्याचा संवाद आहे. ही क्लिप माॅर्फ केली असल्याचा दावा नारनवरे यांनी केला आहे. याप्रकरणी सायबर क्राईमकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.याप्रकरणी पत्रकारांनी गृहमंत्री वळसे-पाटील यांना विचारणा केल्यानंतर ते म्हणाले, 'ही क्लिप मी पण ऐकली आहे. ही गंभीर गाेेष्ट आहे. यासंदर्भात चाैकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले आहेत. हा अहवाल पंधरा दिवसांत आल्यानंतर त्यावर राज्य सरकार निर्णय घेईल.'
दरम्यान, नारनवरे यांना निलंबित करावेत अशी मागणी केली जाऊ लागली आहे.यासंदर्भातील मेसेजही साेशल मीडियावर फिरू लागले आहेत.