प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे येथील फिर्यादी सायरस विन्सेंट क्रिश्चन यांना खोटे आमिष दाखवून आरोपी त्रिमूर्ती किशोरीलाल कर्पे व दीपक कुट्टी व इतर एक व्यक्तीने फिर्यादी कडून तीस लाख रुपये घेऊन आर्थिक गंडा घातला तसेच वारंवार धमक्या देऊन वेळोवेळी खंडणीची मागणी केली फिर्यादी यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन देखील पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही म्हणून फिर्यादी यांनी एडवोकेट साजिद शहा व एच खान यांच्यामार्फत न्यायालयात दाद मागितली होती कोर्टाच्या आदेशानुसार वानवडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात भादवि कलम 419 420 406 384 385 463 464 465 506 504 120b नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी क्रमांक दोन हे ओळखीचे आहेत आरोपी क्रमांक दोन याने आरोपी क्रमांक एक यांची भेट फिर्यादी सोबत घालून दिली त्यावेळेस आरोपी नंबर एक व दोन यांनी संगनमत करून कटकारस्थान रचून प्लॅनिंग ने फिर्यादीला खोटे आमिष दाखवून फिर्यादी कडे 25 लाख रुपयांची मागणी केली त्या मोबदल्यात फिर्यादीला नफा व आरोपी नंबर एक यांच्याकडे असलेले गोवा येथील मिळकतीचे दस्तऐवज फिर्यादी कडे ठेवण्यास सांगितले आरोपी नंबर दोन हा फिर्यादीच्या मित्र असल्याने व त्याच्यावर फिर्यादीच्या भरोसा व विश्वास असल्याने फिर्यादीने आरोपी नंबर दोन याला 25 लाख रुपये बँकेद्वारे दिले याबाबत फिर्यादीने आरोपी सोबत म्युच्युअल करारनामा देखील बनविला जेव्हा फिर्यादीने आरोपीकडे पैशांची मागणी केली असता आरोपीने पैसे देण्यास नकार दिले तसेच आरोपींनी फिर्यादी कडून परत पाच लाख रुपये उकळून घेतले तसेच परत फिर्यादीला पैशांसाठी धमक्या दिल्या आरोपी नंबर एक व दोन व तीन यांनी फिर्यादीचे दस्तऐवज मध्ये हेराफेरी करून बदल करून दस्तऐवज गायब गहाळ केले होते व फिर्यादीचे आरबीएल बँकेचे चेक देखील गहाळ केले होते तसेच वेळोवेळी फिर्यादीला ब्लॅकमेलिंग करीत होते तसेच आरोपी क्रमांक तीन हा पोलीस खात्यामध्ये नोकरीला असून या सर्व आरोपींनी फिर्यादीच्या भयंकर मानसिक शारीरिक छळ केला आर्थिक फसवणूक केली ब्लॅकमेलिंग केले धमक्या दिल्या खंडणीची मागणी केली म्हणून फिर्यादी यांनी एडवोकेट साजिद ब शाह व एडवोकेट एच एच खान यांच्यामार्फत मेहरबान कोर्टात प्रायव्हेट तक्रार दाखल केली होती फिर्यादी तर्फे एडवोकेट साजिद ब शहा व एडवोकेट एच एच खान हे काम पाहत आहे....