प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पिंपरी चिंचवड शहरामध्ये १ जुलै पासून लादलेल्या पे अँड पार्किंग धोरणाला शहरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून या धोरणामुळे सामान्य जनतेची व कामगारांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे *अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त मा. राजेश पाटील , महापौर मा. माई ढोरे , आमदार लक्ष्मण जगताप , भाजप शहराध्यक्ष व भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे याना दिले होते.* परंतु आज आठवडा उलटून देखील पे अँड पार्किंग धोरण रद्द करण्यासंदर्भात कसल्याही हालचाली होत नसल्याने अपना वतन संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.
*पे अँड पार्किंग धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्वच राजकीय पक्ष व संघटनांनी विरोध दर्शविला आहे .असे असताना हे धोरण कुणाच्या हितासाठी रेटून नेण्यात येत आहे?* असा सवाल अपना वतन संघटनेच्या वतीने करण्यात आला असून *शनिवार पासून अपना वतन संघटनेच्या वतीने शहरातील सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या व शहरातील आमदार , पक्षनेते ,विरोधीपक्षनेते यांच्या कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहेत . याची सुरवात शनिवार दि. २४/०७/२०२१ रोजी मा. महापौर यांचे जनसंपर्क कार्यालय ,सांगवी गावठाण याठिकाणी लोकशाही व सनदशीर मार्गाने ठिय्या आंदोलन करून करण्यात येणार आहे.* याची दखल वेळीच घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणायचा इशारा संघटनेने दिला आहे.
*मा. सिद्दीकभाई शेख,*
*अध्यक्ष ,अपना वतन संघटना ,*
*मो. ९६६५४८४७८६*
▪️