प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इंधन व गॅस दरवाढ विरोधात पेठ वडगाव येथे नगरपालिका चौक येथे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सेवादल व वडगाव शहर अनुसूचित जाती विभाग यांच्या वतीने महागाई विरोधात केंद्र सरकार यांच्या विरोधात आंदोलन घेण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब व हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू बाबा आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गॅस पेट्रोल डिझेल खाद्यतेल व जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर याबद्दल बुधवार दिनांक 14/7/2021 रोजी पेठ वडगाव नगरपालिका चौकात सोशल डिस्टन्स चे पालन करून आंदोलन करण्यात आले यावे गॅस सिलेंडर ला श्रद्धांजली वाहून तेथेच चुलीवर जेवण बनवून आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप सरकार चे करायचे काय, खाली डोके वर पाय, जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी झाले पाहिजे, व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी कोल्हापूर जिल्हा सेवादल अध्यक्ष रंगराव देवने साहेब, जिल्हा सेवादल प्रवक्ता रंजीत सिंह पाटील यांची भाषणे झाली यावेळी ब्लॉक कमिटीच्या अध्यक्ष सो हेमलता माने म्हणाल्या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने महिलांचे आर्थिक गणित कोलमडले असून याचा आम्ही निषेध करत आहे आभार वडगाव शहर अनुसूचित जाती विभागा चे शहराध्यक्ष विकासराव कांबळे यांनी मानले, कोल्हापूर जिल्हा सेवादलाचे अध्यक्ष रंगराव देवने, जिल्हा प्रवक्ता रंजीत सिंह पाटील,कोल्हापूर जिल्हा सचिव रघुनाथ पिसे, महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष सो हेमलता माने, वडगाव शहर अनुसूचित जाती विभाग विकास कांबळे, सामाजिक कार्यकर्ते वैभव घोरपडे, आदिलशहा फकीर, राजकुमार मिठारी, कल्याणी माने, कमलताई हेगडे, निखिल रसाळ, इत्यादी उपस्थित होते