प्रेस मीडिया वृत्तसेवा :
नवी दिल्ली : देशामध्ये करोनाने चांगलाच धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. या करोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांचा बळी गेला आहे. मात्र या करोनाची अनेकांना धडकी भरली असून आपल्याच रक्ताच्या नात्यांचा विसर पडला. अनेकांनी तर नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह स्वीकारण्यास कोणी आले नाही आणि आता करोना मृतांच्या नातेवाईकांना जी मदत केली जात आहे, ती घेण्यासाठी एकाच व्यक्तीच्या तीन-तीन लोकांनी त्यासाठी क्लेम केल्याची घटना समोर आली आहे.
करोनामुळे मृत्यू झाल्यावर रुग्णांकडे पाठ फिरवणारे नातेवाईक आता मात्र मदत मिळावी म्हणून कायदेशीर बाबी करण्याची खटपट करताना पाहायला मिळत