निवडणूक डोळ्या समोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्रिमंडळाचा जम्बो विस्तार



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशसह पंजाब, कर्नाटक आणि गुजरातमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा जम्बो विस्तार केला. हा विस्तार करताना पंतप्रधानांनी धक्कातंत्राचा वापर करत प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन यांच्यासह 12 मंत्र्यांचा राजीनामा घेतला, तर नव्या 15 जणांना  कॅबिनेट आणि 28 जणांना राज्यमंत्री बनवले. रात्री उशिरा नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटपही जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातून नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले असून त्यांच्याकडे लघु-मध्यम उद्योग खाते देण्यात आले आहे, तर कपिल पाटील (पंचायत राज), भारती पवार (आरोग्य) आणि भागवत कराड (अर्थ) यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे.पंतप्रधान मोदींनी 78 जणांचे मंत्रिमंडळ स्थापन करताना मोठे फेरबदल केले आहेत. अश्विनी वैष्णव (रेल्वे), धर्मेंद्र प्रधान (शिक्षण), मनसुख मांडवीय (आरोग्य), ज्योतिरादित्य शिंदे (हवाई वाहतूक), अनुराग ठाकूर (माहिती प्रसारण) आणि हरदीप सुरी यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये सायंकाळी सात वाजता शपथविधी झाला. सुमारे दीड तास हा सोहळा सुरू होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्री उपस्थित होते. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले. 43 मंत्र्यांमध्ये 36 नवीन चेहेरे आहेत.

सहा राज्यमंत्र्यांना प्रमोशन मिळाले

सहा राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचे प्रमोशन मिळाले आहे. त्यांनी आज पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यामध्ये अनुराग ठाकूर, किरण रिजिजू, राजकुमार सिंह, हरदिपसिंह सुरी, मनसुख मांडविय आणि पुरुषोत्तम रुपाला यांचा समावेश आहे. हे आता कॅबिनेट मंत्री असणार आहेत.

सात महिलांना मंत्रिमंडळात स्थान

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सात महिलांना स्थान मिळाले आहे. त्यात अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल (उत्तरप्रदेश) यांच्यासह भाजपच्या सात महिला खासदारांचा समावेश आहे. त्यामध्ये शोभा करंदलाजे (कर्नाटक), मिनाक्षी लेखी (दिल्ली), अन्नपूर्णा देवी (झारखंड), प्रतिमा भौमिक (त्रिपुरा), दर्शना जरदोस (गुजरात) आणि महाराष्ट्रातील दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांचा समावेश आहे.

13 वकील, 6 डॉक्टर, 5 इंजिनिअर

  • मंत्रिमंडळात समावेश झालेल्यामध्ये 13 वकील, 6 डॉक्टर, पाच इंजिनिअर आणि 7 माजी सनदी अधिकाऱयांचा समावेश करण्यात आला आहे.
  • 50 पेक्षा कमी वय असलेले 13 मंत्री आहे. 39 माजी आमदार आहेत. दोन माजी मुख्यमंत्री आहेत.
    या बारा मंत्र्यांचा राजीनामा
  • विस्ताराबरोबरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. तब्बल 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला.
  • सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी मंगळवारीच राजीनामा दिला होता. त्यांची कर्नाटकाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. बुधवारी हायप्रोफाईल मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यात आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन,

माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह सदानंद गौडा आणि कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार या कॅबिनेट मंत्र्यांना डच्चू मिळाला. महाराष्ट्रातील संजय धोत्रे, रत्नलाल कटारिया, बाबूल सुप्रियो, प्रतापचंद्र सारंगी आणि देबश्री चौधरी या पाच राज्यमंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागला.

उत्तर प्रदेशला झुकते माप......

विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर प्रदेशला झुकते माप देण्यात आले असून 8 मंत्रिपदे दिली आहेत. गुजरातमधून 6, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधून प्रत्येकी 4 तर मध्य प्रदेश आणि ओडिशातून प्रत्येकी दोघांना मंत्री करण्यात आले आहे. आसाम, पंजाब, हिमाचल प्रदेश, मणिपूर, झारखंड, राजस्थान, तमीळनाडू, त्रिपुरा यांनाही प्रतिनिधित्व मिळाले.

मित्रपक्षांचे तीनच मंत्री.....

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मित्रपक्षांतील केवळ तीन मंत्र्यांना स्थान दिले आहे. यामध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयूचे रामचंद्र प्रसाद सिंह आणि लोकजनशक्ती पार्टीचे बंडखोर नेते पशुपतीकुमार पारस हे कॅबिनेट मंत्री तर अपना दलच्या अनुप्रिया पटेल या राज्यमंत्री आहेत.

महाराष्ट्रातून यांना मिळाली संधी....

  • नारायण राणे
  • कपिल पाटील
  • भारती पवार
  • भागवत कराड
  • यांना बढती मिळाली
  • अनुराग ठाकूर
  • हरदीप सिंग पुरी
  • किरेन रिजिज्जू
  • जी किशन रेड्डी
  • यांना मिळाला डच्चू
  • हर्षवर्धन
  • रमेश निशंक
  • प्रकाश जावडेकर
  • रविशंकर प्रसाद
  • संजय धोत्रे
  • सदानंद गौडा
  • गंगवार
  • बाबुल सुप्रियो

कुणाला काय......

  • अश्विनी वैष्णव - रेल्वे
  • मनसुख मांडवीय - आरोग्य
  • ज्योतिरादित्य - हवाई वाहतूक
  • हरदीप पुरी - पेट्रोलियम
  • धर्मेंद्र प्रधान - शिक्षण
  • नारायण राणे - लघु, मध्यम उद्योग

असे आहे नवे मंत्रिमंडळ.....

  • नरेंद्र मोदी - पंतप्रधान, कार्मिक, अणुऊर्जा, विज्ञान-तंत्रज्ञान, न विभागून दिलेली खाती
  • कॅबिनेट मंत्री
  • राजनाथ सिंह - संरक्षण
  • अमित शहा - गृह, सहकार
  • नितीन गडकरी - परिवहन
  • निर्मला सीतारमण - अर्थ, कॉर्पोरेट व्यवहार
  • नरेंद्रसिंह तोमर - कृषी आणि शेतकरी विकास
  • डॉ. सुब्रमण्यम जयशंकर - परराष्ट्र
  • अर्जुन मुंडा - आदिवासी विकास
  • स्मृती इराणी - महिला व बाल विकास
  • पियूष गोयल - वस्त्रोद्योग, वाणिज्य उद्योग, ग्राहक कल्याण
  • धमेंद्र प्रधान - शिक्षणमंत्री, कौशल्य विकास आणि उद्यमशीलता
  • प्रल्हाद जोशी - संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण
  • नारायण राणे - सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
  • सर्बानंद सोनोवाल - आयुष, नौकानयन, बंदरे आणि जलवाहतूक
  • मुख्तार नक्वी - अल्पसंख्याक
  • डॉ. वीरेंद्र कुमार - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
  • गिरीराज सिंह - ग्रामविकास, पंचायती राज
  • ज्योतिरादित्य सिंधिया - नागरी उड्डाणमंत्री
  • रामचंद्र प्रसादसिंह - पोलाद
  • अश्विनी वैष्णव - माहिती-तंत्रज्ञान आणि दळणवळण
  • पशुपती कुमार पारस - अन्न प्रक्रिया उद्योग
  • गजेंद्र सिंह शेखावत - जलशक्ती
  • किरेन रिजिजू - कायदा आणि न्याय
  • राज कुमार सिंह - ऊर्जा,
  • हरदीप सिंग पुरी - पेट्रोलियम, नगरविकास आणि गृहनिर्माण
  • मनसुख मांडविया - आरोग्य, खते आणि रसायन
  • भूपेंद्र यादव - कामगार, पर्यावरण, वन आणि हवामान बदल
  • डॉ. महेंद्र पांडे - अवजड उद्योग
  • डॉ. पुरुषोत्तम रूपाला - मत्स्य, पशु आणि दुग्धविकास
  • जी. किशन रेड्डी - सांस्कृतिक, पर्यटन, पूर्वांचल विकास
  • अनुरागसिंह ठाकूर - माहिती प्रसारण, युवा आणि क्रीडा
  • राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
  • राव इंद्रजीत सिंह - सांख्यिकी-प्रोग्राम, नियोजन, कॉर्पोरेट व्यवहार
  • डॉ. जितेंद्र सिंह - विज्ञान-तंत्रज्ञान, भूगर्भ विज्ञान, पीएमओ कार्यालय, कार्मिक, तक्रार निवारण, पेन्शन, आण्विक ऊर्जा, अंतराळ विभाग
  • राज्यमंत्री
  • श्रीपाद नाईक - बंदरे, नौकानयन, पर्यटन
  • फगनसिंह कुलस्ते - पोलाद, ग्रामविकास
  • प्रल्हादसिंह पटेल - जलशक्ती, अन्न प्रक्रिया उद्योग
  • अश्विनी कुमार चौबे - ग्राहक, अन्नपुरवठा, पर्यावरण, वन आणि वातावरण बदल
  • अर्जुन राम मेघवाल - संसदीय कार्यमंत्री, सांस्कृतिक खाते
  • निवृत्त जनरल व्ही. के. सिंह - परिवहन-राजमार्ग, नागरी उड्डाणमंत्री
  • किशन पाल - वीज, अवजड उद्योग
  • रावसाहेब दानवे - रेल्वे, कोळसा, खाण उद्योग
  • रामदास आठवले - सामाजिक न्याय
  • साध्वी निरंजन ज्योती - ग्राहक व्यवहार, अन्नपुरवठा, ग्रामविकास
  • डॉ. संजीव कुमार बालयन - मत्स्य, पशुपालन आणि दुग्धविकास
  • नित्यानंद राय - गृहमंत्रालय
  • पंकज चौधरी - अर्थखाते
  • अनुप्रिया सिंह पटेल - वाणिज्य आणि उद्योग
  • प्रा. एस. पी. सिंह बाघेल - कायदा आणि न्याय
  • राजीव चंद्रशेखर -कौशल्य विकास, इलेक्ट्रॉनिक, माहिती प्रसारण
  • शोभा करंजलाजे - कृषी आणि शेतकरी विकास
  • भानूप्रतापसिंह वर्मा - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग
  • दर्शन विक्रम जार्देश - वस्त्रोद्योग, रेल्वे
  • व्ही. मुरलीधरन - परराष्ट्र व्यवहार, संसदीय कामकाज
  • मीनाक्षी लेखी -परराष्ट्र व्यवहार, सांस्कृतिक खाते
  • सोम प्रकाश - वाणिज्य आणि उद्योग
  • रेणुकासिंह सरूता - आदिवासी विकास
  • रामेश्वर तेली - पेट्रोलियम-नैसर्गिक वायू, कामगार सक्षमीकरण
  • कैलाश चौधरी - कृषी आणि शेतकरी कल्याण
  • अन्नपूर्णा देवी - शिक्षण
  • ए. नारायणस्वामी -सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
  • काwशल्य किशोर - गृहनिर्माण आणि नगर विकास
  • अजय भट - संरक्षण, पर्यटन
  • बी. एल. वर्मा - पूर्वांचल विकास, सहकार
  • अजय कुमार - गृहखाते
  • देवूसिंह चौहान - दळणवळण
  • भगवंत खुबा - नव आणि अपारंपरिक ऊर्जा, रसायने-खते
  • कपिल पाटील - पंचायती राज
  • प्रतिमा भौमिक - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
  • डॉ. सुभाष सरकार - शिक्षण
  • डॉ. भागवत कराड - अर्थखाते
  • डॉ. राजकुमार रंजन सिंह -परराष्ट्र व्यवहार, शिक्षण
  • डॉ. भारती पवार - आरोग्य आणि कुटुंब कल्याण
  • बिस्वेश्वर तुडू - आदिवासी विकास, जलशक्ती
  • शंतनू ठाकूर - बंदरे, नौकानयन
  • डॉ. मुजापरा महेंद्रभाई - महिला आणि बालविकास, आयुष
  • जॉन बारिया - अल्पसंख्याक विकास
  • एल. मुरुगन - मत्स्य, पशु आणि दुग्धविकास, माहिती आणि प्रसारण
  • निसिथ प्रामाणिक - गृह, युवा आणि क्रीडा खाते

Post a Comment

Previous Post Next Post