कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार.... सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

मुंबई-  कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा राज्य शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार चौथ्या स्टेजमध्ये होता त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने निर्बंध कायम करताना कारवाईची मोहीम हाती घेतली होती या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील व्यापारी उद्योजक यांनी व्यवसाय सुरू करण्याबाबत घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळे कोल्हापूर शहरातील उद्योग व व्यापार सुरू करण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध हटवत काही अटीसह परवानगी दिली, याच प्रमाणे संपूर्ण जिल्ह्यांमधील सर्व विभागांमध्ये ज्या ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या मर्यादित आहे अशा सर्व शहरात अथवा गावांमधील व्यापारी उद्योजकांना शासनाने निश्चित केलेल्या अटी  शर्ती व निर्बंधाचे पालन करून आपले व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी यासाठी मी स्वतः बुधवारी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी असा आग्रह करणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे,

सततच्या लाॅकडाऊन मुळे छोटे-मोठे व्यापारी उद्योजक यांचे व्यवहार मागील वर्ष दीड वर्षापासून अनियमित झाले आहेत त्यामुळे अशा सर्व व्यापार्‍यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे, लॉकडाउन मधून शिथीलता मिळालेल्या इतर घटकांप्रमाणे शासनाचे सर्व निर्बंध पाळून आम्ही व्यापारी व्यवसाय सुरू करू यासाठी आम्हाला परवानगी द्या अशी मागणी सातत्याने व्यापारी वर्गातून होत होती याचा विचार करताना राज्य शासनाने कोल्हापूर शहरातील व्यापारी उद्योजकांना आपले व्यापार व्यवसाय सुरू करण्यासाठी नुकतीच परवानगी दिली ही बाब समाधानकारक आहे परंतु कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर सर्व ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या कमी असलेल्या शहर अथवा गावांमधील छोट्या-मोठ्या सर्व व्यापारी उद्योजकांना शासनाने निश्‍चित केलेले निर्बंध पाळून आपले व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी याबाबतची भूमिका मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून मी मांडणार असल्याचेही शेवटी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post