प्रेस मीडिया वृत्तसेवा :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याची मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना अस्वस्थ वाटू लागल्यानं जयंत पाटील बैठक अर्धवट सोडून रुग्णालयामध्ये रवाना झाले.
जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली होती.राज्याची मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना जयंत पाटीला यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे जयंत पाटील स्वत: बैठकीतून बाहेर आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा देखील आहे.