प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमधील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. सकाळी 10 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने ते चिपळूणसाठी रवाना होणार आहेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे 11 वाजता ते पोहोचतील. त्यानंतर ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी 12.20 वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. त्यानंतर ते दुपारी 2.40 वाजता अंजनवेलहून हेलिकॉपटरने मुंबईकडे रवाना होणार आहेत.