प्रेस मीडिया वृत्तसेवा :
आनंद शिंदे :
राज्याचे मदत पुनर्वसन ,तसेच ओबीसी कल्याण मंत्री माननीय नामदार विजय वडेट्टीवार यांचा सांगली जिल्हा ओबीसी व्हीजेएनटी संघटनेच्यावतीने तासगाव येथे ओबीसी व्हीजेएनटी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नेते मा. अरुण खरमाटे व ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा देऊन ओबीसी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध सामाजिक संघटना चे सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते ,सामाजीक,राजकीय व पूर परिस्थिती यावर चर्चा करण्यात आली काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडचणी मंत्री महोदयांना सांगितल्या याप्रसंगी तासगांव तालुका नेते साहेबराव पाटील, माननीय प्राध्यापक डी. ए.माने .ओबीसीचे नेते शिवसेना जिल्हा प्रमुख मा.संजय विभुते ( बापु) काँग्रेस पक्षाचे तासगाव तालुका अध्यक्ष महादेव पाटील, सावर्डे चे सरपंच प्रदीप ( काका ) माने ,युवा नेते डॉक्टर विवेक गुरव मा. सुशांत शिंदे अर्जुन पाखले,दिपक सुतार, उपस्थित होते.