प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यात आज दिल्लीत बैठक झाली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, असाही तर्क लावण्यात येत होता. त्यामुळे या भेटीने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कडाडून टीका केली आहे.
अंजली दमानिया यांनी ट्विट करून या भेटीवर टीकास्त्र सोडलं आहे. ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, 15 जुलै फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?), 16 जुलै फडणवीस दिल्ली ला जातात, 17 जुलै शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात.महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही, असं अंजली यांनी म्हलटं आहे.
अंजली दमानिया यांनी मोदी-पवार भेटीचा संदर्भ राज्याच्या राजकारणाशी जोडला आहे. यापूर्वी या भेटीवर जयंत पाटील आणि संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.मोदी-पवार यांच्यातील भेट सहकार क्षेत्रासंदर्भात होती, असं जय़ंत पाटील यांनी आधीच म्हटलं आहे. तर या राजकारण आहे, अस वाटत नसल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.