प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापुरात सगळीकडे पाणीच पाणी आहे. पुणे-बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आलीय.सांगली-कोल्हापूर बायपास रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तर पन्हाळा रस्ता खचून वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.पंचगंगा नदीची पातळी 51 फुटांवर गेली आहे. यमगर्णी आणि निपाणीमध्ये रस्त्यावर पाणी आल्याने पुणे बेंगलुरू हायवे बंद झाला आहे. पुणे- बेंगलुरू हायवे वाहतुकीसाठी बंद केल्याने वाहनं रस्त्यावरच थांबली आहेत.बॅरिकेड्स लावून पोलिसांनी हे रस्ते बंद केले आहेत.कोल्हापुरात अजूनही पाऊस सुरू आहे.
NDRF च्या दोन टीम्स कोल्हापूरमध्ये दाखल झालेल्या आहेत.एक टीम करवीर तालुक्यात प्रयागचिखली आणि आंबेवाडीमध्ये आहे. तर दुसरी टीम शिरोळ तालुक्यात आहे.गारगोटीकडून गडहिंग्लजकडे जाणाऱ्या मार्गावरील पालघाट या ठिकाणी अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्या आहेत.
तसंच, पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे दगड-धोंडे, खडक घाटातील रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेला आहे. डोंगरातील पाण्याचे मोठे लोंढे घाटातील रस्त्यावर आडवे वाहत आहेत.गारगोटी -कोल्हापूर, गारगोटी-गडहिंग्लज, गारगोटी -कडगाव हे सर्व मार्ग बंद झाले. गारगोटीचा कोल्हापूर जिल्ह्यातील इतर भागाशी संपर्क खंडित झाला आहे. कोल्हापूर महामार्ग बंद झाल्याने याचा परिणाम दूध पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे.
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग
कोयना धरणामधून आज (23 जुलै 2021) सकाळी 8 वाजता सांडव्यावरुन 9567 क्युसेक्स विसर्ग (2 फूट) आणि पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक्स असा एकूण 11,667 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
तर सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवून 50,000 क्युसेक(5 फुट) इतका करण्यात आला.खोडशी बंधाऱ्यातून 15,625 क्युसेक्स तर वारुंजीमधून एकूण 79,599 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.राजाराम बंधाऱ्यातून 71170 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात झालाय. एकूण 116 बंधारे पाण्याखाली आहेत.
बेळगावकडे जाणारी सर्व वाहतूक बंद
सांगली फाटा ते कोल्हापूरकडे सेवारस्ता बंगळूरकडून शिरोलीकडे जाणारा सेवा रस्ता बंद
सांगली फाटा ते सांगली - शिरोली जुण्या नाक्याजवळ पाणी आल्यामुळे रस्ता बंद येथे एकेरीवाहतूक सुरू
सांगली ते कोल्हापूर बायपास रस्ता वाहतुकीसाठी बंद
एन.एच ४ महामार्ग मांगूर फाट्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीस बंद -परिणामी कागल-निपाणी रस्ता बंद
कोल्हापूर- पन्हाळा मार्ग बंद
गारगोटी ते गडहिंग्लज मार्गावर पालघाट मध्ये दरडी कोसळली, घाटातील रस्ता बंद
गारगोटी कोल्हापूर- गारगोटी गडहिंग्लज - गारगोटी कडगाव मार्ग बंद
भेडसगाव वरून सांगलीकडे जाणारा मार्ग बंद
आंबोली घाटात दरड कोसळली मार्ग वाहतुकीस बंद
परिते ते गौबी रस्ता बंद दरड कोसळली
शिये-कसबाबावडा पाणी आल्यामुळे बंद
शिये-भुये-निगवेकडे जाणारा मार्ग बंद
कोल्हापूर-इचलकरंजी मध्ये येणारीवाहने एमआयडीसी शिरोलीतून सोडली जातात, अवजड वाहतूक बंद
शिरोळ ते कुरुंदवाड जुन्या पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद
नांदणी ते कुरुंदवाड पाणी आल्यामुळे वाहतूक बंद
शिरोळ ते धरणगुत्ती ते नांदणी असा मार्ग बंद - शिरोळ-इचलकरंजी संपर्क तुटला
मध्यरात्री १२ .०० ० - पंचगंगेने धोका पातळी ओलांडली
बालिंगा दोनवडे पुलाच्या बाजूला पाणी आल्यामुळे मार्ग वाहतुकीस बंद
चिखलीतील लोकांचे स्थलांतर
सांगली ते कोल्हापूर बायपास रस्ता वाहतुकीसाठी बंद
हणमंतवाडी नदी काठच्या १४ कुटुंबियांना व जनावरांचे स्थलांतर
राधानगरी तालुक्यात कोनोली तर्फे कुपलेवाडी घरावर दरड कोसळली - दोघे मृत
बस गेली वाहून, नाशिकचे ११ प्रवासी सुखरूप
भूदरगड मधील घटना - रत्नागिरीचे प्रवासी २५ पन्हाळ्याजवळ बचावले
गडहिंग्लज येथील नदीवेस लाखे नगर येथील लोकांचे स्थलांतर
नृसिंहवाडी येथील दत्त मंदीर पूर्ण पाण्याखाली
नांदणी शिरढोन रस्त्यावर पाणी वाहतूक बंद कवठेसारचा शिरोळ तालुक्याशी संपर्क बंद
सांगली-कोल्हापूर बायपास रोडवर उदगाव येथील ओढ्यावर बॅक वॉटरमुळे पुराचे पाणी -रस्ता बंद
पन्हाळा रस्ता खचला - मुख्य प्रवेशद्वार चार दरवाजा जवळ
नांदणी धरणगुत्ती रस्त्यावर पाणी - वाहतुकीसाठी बंद
गडहिंग्लज तालुक्यात विक्रमी पावासाची नोंद १५.७२ मी.मी. दिवसांत
हणमंतवाडी, नागदेववाडी, पाडळी खुर्द येथील पूरबाधितांचे स्थलांतर
हेरवाड ते अब्दुललाट रस्ता वाहतुकीसाठी बंद