मनु फरास :
इचलकरंजी :. नुकतेच सरपंचांच्या कारभाऱ्याना ग्रामपंचायत मध्ये बसल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. असेच जर सर्व नगरपालिका , महानगरपालिका मध्ये सुरू झाले तर नगरसेविका पतिना सुद्धा चाप बसून त्यांना कामात ढवळा ढवळ करता येणार नाही व नगरसेविकांना सुद्धा आपली कामे ठीक पणे करता येतील.
पन्नास टक्के आरक्षण असून काय काहीही उपयोग नाही कारण कारण नगरसेविका फक्त पालिकेत सही करण्यासाठीच बाकीची कामे पतीदेव सांभाळतात. पालिकेच्या कामकाजात पती देव बाजूलाच खुर्ची घेऊन बसलेले असतात. हे सर्व थांबले पाहिजे. नगर सेविका पतीना सुद्धा आता पालिकेत बसल्यास कारवाई करण्यात यावी असा नियम लागू केल्यास पालिके सोबत जनतेचे सुद्धा भले होईल अशी चर्चा सध्या सर्वत्र जोरदार सुरू असल्याचे दिसत आहे.