दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचे तुकडे करून काळीज खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलास न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

कोल्हापूर - जन्मदात्या आईचा दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचे तुकडे करून काळीज खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलास न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

सुनील कुचकोरवी असे आरोपीचे नाव असून कावळा नाका येथील माकडवाला वसाहतीत तो वास्तव्यास होता. २८ ऑगस्ट २०१७ रोजी त्याने आईने दारूला पैसे दिले नाहीत म्हणून तिचा तुकडे करून निघृण खून केला होता. याघटनेप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी केला. या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायाधीश (वर्ग ४) महेश जाधव यांच्या न्यायालयात पार पडले.सरकार पक्षातर्फे विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सुनीलला दोषी ठरवले.

न्यायालयाने सुनीलचे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे नमूद करून आज (गुरुवार) त्याला फाशीची शिक्षा सुनावली. कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच फाशीची शिक्षा आहे. जन्मठेप की फाशीची शिक्षा याबाबत दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post