प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

दलित महासंघाच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र अधिविभागाचे पीएचडी चे संशोधक विद्यार्थी अमोल महापुरे यांनी ” कोल्हापुरातील दलित चळवळ : विशेष संदर्भ दलित महासंघ ” असा लेख लिहिला आहे. या लेखामध्ये दलित महासंघाच्या स्थापनेचा वृत्तांत विषद केला आहे. या लेखामध्ये जी माहिती लिहिलेली आहे ती अपुरी असून दलित महासंघाच्या स्थापनेमध्ये ज्यांचे योगदान आहे त्यांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त असताना ते जाणीवपूर्वक टाळलेले आहे. त्यामुळे अमोल महापूरे यांचा हा लेख एकतर्फीच वाटतो अशी  प्रतिक्रिया भारत धोंगडे यांनी या लेखावर व्यक्त केली आहे. 

    कारण ५ जूलै १९९२ रोजी कोल्हापुरातील बिंदू चौकामध्ये करसेवेच्या निषेधार्थ , दलित अल्पसंख्यांकांना संरक्षण मिळावे, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे , बेरड रामोशी मांग गारूडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा व शहरातील झोपडपट्टीधारकांना संरक्षण मिळावे या मागण्यांच्यासाठी दलित महासंघाच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते . या उपोषणात दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे , उपाध्यक्ष प्रा. शामराव वंटमोरे , प्रा. गोरख सांगळे , तानाजी कवाळे , नेताजी कवाळे , भास्कर मधाळे, दत्ता मुळगेकर, मनोहर आवळे , अरविंद चव्हाण ,पी जी कुसाळे , मारुती अवघडे , श्रीपती शिंदे , अर्जुन नाईक , शेखर कवाळे आदींनी भाग घेतला होता तर कॉम्रेड गोविंद पानसरे , रिपब्लिकन पार्टीचे आंबेडकर गटाचे भारत धोंगडे आदींनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त व्यक्त करून दलित महासंघाच्या स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. असे असतानाही दलित महासंघाच्या सुरुवातीच्या काळात ज्यांचे योगदान आहे त्यांचा उल्लेख या लेखांमध्ये आवर्जून होणे गरजेचे असतानाही अमोल महापुरे किंवा दलित महासंघाच्या वतीने ही वस्तुस्थिती टाळलेले दिसून येते. खरे पाहता ज्यांचे दलित महासंघाच्या स्थापनेच्या कालामध्ये प्रा .मच्छिंद्र सकटे यांच्या खांद्याला खांदा देऊन ज्यांनी परिश्रम घेतले उदाहरणार्थ श्री.भारत धोंगडे ,नेताजी कवाळे ,तानाजी कवाळे, निवृत्त प्रा .शामराव वंटमोरे आदींचे मोलाचे योगदान असतानासुद्धा त्याचा या लेखामध्ये कुठेही उल्लेख नाही. याची खूप मोठी खंत वाटते .योगदान आहे अशांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होणे आवश्यक असताना असा अपुऱ्या माहितीवर लेख लिहून समाजाची दिशाभूल करणे हे विसंगत वाटते .स्वतःला संशोधक अभ्यासक म्हणवून घेणाऱ्यांनी जबाबदारीने व गांभीर्यपूर्वक लेखन करणे आवश्यक होते.परंतु गांभीर्याचा अभाव व बेजबाबदारपणा या लेखातून स्पष्टपणे दिसतो आहे.

    दलित महासंघाच्या नेत्यांच्या अशा या कर्तृत्वामुळेच आज दलित महासंघाची अवस्था काय आहे ही सर्वांच्या समोर असून यात दलित महासंघाच्या वतीने वेळीच योग्य तो बदल केला तरच दलित महासंघास पूर्वीसारखे दिवस येतील असे वाटते. अन्यथा ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था होईल आणि एकेकाळी नावारुपास आलेली ही संघटना मोडकळीस निघण्यास वेळ लागणार नाही.