प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापूर - ग्राहक पंचायत महाराष्ट्रचा ऑनलाईन सामाजिक चातुर्मास 2021चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या उद्धघाटन समारोहच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड़ होते.....!
अध्यात्मिक चातुर्मासासोबत सामाजिक चातुर्मास ही झाला पाहिजे, अशी संकल्पना ग्राहक पंचायतचे संस्थापक बिंदुमाधव जोशी यांनी सन 2002मध्ये मांडली होती. जळगाव जिल्हा शाखेने
याचे आयोजन केले आहे.चार महिन्यात ग्राहक प्रबोधनाचे 20 ते 22 कार्यक्रम होतील.या सामजिक चातुर्मासाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाचे माहीती व जनसंपर्क महासंचालनायचे संचालक गणेश रामदासी होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद, लक्ष्मी नारायण, ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. शुभांगी पिंपगांवकर यांनी ग्राहक गित म्हटले. राज्य सह संघटक मेधा कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. वसुधा जहागिरदार यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला......!
गणेश रामदासी यांनी सायबर क्राइम वाढले आहेत. त्यामुळे डिजिटल व आर्थिक साक्षरता आवश्यक असल्याचे सांगितले.सुरक्षिततेसाठी गृह मंत्रालयाने देशभरासाठी 155260 हा हेल्प लाईन नंबर दिला आहे.तसेच जे चांगले आहे ते ठासून सांगितले पाहिजे. म्हणजे वाईट पासून लोक लांब राहतील व ग्राहक पंचायतचा उद्देश ही सफल होईल. बिंदुमाधव जोशी यांच्या काळातच ग्राहक पंचायत वटवृक्ष झाले आहे. त्यांच्या पारंब्या ही फोफावत आहे, त्याचे ही संवर्धन प्रशासन करेल...!
डॉ.विजय लाड़ यांनी कोणत्याही कार्याची सुरुवात समाजसेवा,देशसेवा,अध्यात्मिक सेवा या तीन पैकी एका कारनाणे होते.चतुर्मासाची या तिन्हीची प्रेरणा आहे.आमचे विराट सहजीवन आहे. विश्वासाने व समाज शरण वृत्तीने काम केले पाहिजे. भगवंत झोपले आहे. त्याचा अंश म्हणून काम केले पाहिजे....!
सूत्र संचालन जळगांव जिल्हाध्यक्ष मनोज जैन, तांत्रिक बाजु महेश चावला तर आभार प्रदर्शन राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमास राज्यातील सर्व पदाधिकारी तसेच कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.