आ.सुमनताईंनी कोकळे येथे केले बंधाऱ्याच्या कामाचे उद्घाटन!




ओमकार पाखरे : 

   कोकळे (ता.कवठेमहांकाळ): येथील महांकाली नदीवर कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या कामाचे उद्घाटन कवठेमहांकाळ तालुक्याच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या बंधाऱ्याचा जलसाठा क्षमता एक लाख, 39 हजार, 284 स घनमीटर इतका असून सिंचनक्षमता 44 हेक्टर इतकी आहे.या बंधाऱ्यामुळे कोकळे गावातील शेतीचा विकास होण्यास मदत होणार आहे असे आमदार सुमनताई पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेशभाऊ पाटील,मार्केट कमिटीचे चेअरमन दादासाहेब कोळेकर,महांकाली उद्योग समुहाच्या अध्यक्षा आनिताताई सगरे,जि.प सदस्या आशाराणी पाटील,माजी बांधकाम सभापती दत्तात्रय पाटील,राष्ट्रवादीच्या नेत्या माजी सभापती सुरेखाताई कोळेकर, पंचायत समितीचे सभापती विकास हाक्के, उपसभापती निलमताई पवार,कोकळे नगरीचे सरपंच व उद्योगपती धनाजीराव भोसले, उपसरपंच विजयभाऊ तोडकर, कॉग्रेसचे नेते धनाजी पाटील, माणिकराव भोसले, राष्ट्रवादीचे नेते जयसिंगराव पाटील, गजानन (तात्या) ओलेकर, वासुदेव ओलेकर, बाळासाहेब ओलेकर,भगवान दुधाळ,भारत माने,पिंटू कांबळे व कोकळे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post