पूर परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन सतर्क सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली माहिती


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

जयसिंगपूर-

धरण क्षेत्रात पडत असलेला मोठा पाऊस, पंचगंगा नदीचे पात्रा बाहेर गेलेले पाणी, त्याचबरोबर अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे संभाव्य पूरस्थिती चा धोका ओळखून प्रशासनाला सतर्कतेचे आदेश शासनाने दिले आहेत खबरदारी म्हणून कोल्हापूर शहर व शिरोळ तालुक्यासाठी एनडीआरएफ च्या तुकड्या कोल्हापूर व शिरोळ येथे दाखल झालेल्या आहेत अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली, मागील दोन दिवसांमध्ये कोयना, चांदोली तसेच राधानगरी व काळम्मावाडी या धरण क्षेत्रांमध्ये पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाटबंधारे विभागाचे महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव विजय गौतम, पाटबंधारे विभागाच्या पुणे विभागाचे अभियंता श्री. गुणाले तसेच कर्नाटक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी.डी. पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून संभाव्य पूर परिस्थिती आणि उपाययोजनां बाबत आपण चर्चा केली असल्याचे यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यामध्ये जून 2019 मध्ये बेंगलोर येथे झालेल्या बैठकीमध्ये धरणांमधील पाणीसाठ्या बाबतचे  नियोजन दोन्ही राज्यांनी निश्चित केले असून या नियोजनामुळे पूरस्थिती ओढवणार नाही याची काळजी घेतली जाईल, याबाबतच्या सूचना कर्नाटक व महाराष्ट्र राज्याचा पाटबंधारे विभागाला दिल्या असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी  सांगितले आहे, सध्या आलमट्टी धरणामधून 97 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने गुरुवारपासून कोयना धरणातून 11000 क्युसेक्सने नदीपात्रात विसर्ग केला जाणार आहे त्यामुळे कृष्णा काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन ही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शेवटी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post