प्रेस मीडिया वृत्तसेवा :
अप्पासाहेब भोसले : हातकणंगले तालुका प्रतिनिधी :
इचलरकंजी ॲक्टिव ग्रुप च्या वतीने मंगळवार दिनांक 20 जुलै 2021.रोजी आषाढी एकादशीनिमित्त थोरात चौक येथील विठ्ठलाच्या मंदिरात एक अनोखा उपक्रम संपन्न करण्यात आला यावेळेस सर्व भक्तांना तुळशीची रोपे व राजगिऱ्याचे लाडू आणि केळी वाटप करून एक अनोखा उपक्रम साजरा करण्याचा प्रयत्न केला याप्रसंगी अनिता माने यांनी उपक्रमाचे *प्रास्ताविक* केले व शेवटी *आभार* सरिता पांडव यांनी केले याप्रसंगी उपस्थित श्री लक्ष्मण पाटील सर , शिवकुमार मुरतले (सर) स्वप्नील पाटील, राखी मुरतले, संजीवनी हरिहर, कविता शिंगाडे, गीता भागवत, अनिता बिरंजे, माधवी करंगळे, प्रियांका काकडे, विजया तोडकर( माळी) इत्यादी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.