प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापूर ता. ६ शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनांतर्गत डी.आर. के.कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर क्लस्टर ,महाराष्ट्र शासनाच्या राजाराम कॉलेजचा राज्यशास्त्र विभाग यांच्या वतीने ' अभिव्यक्ती स्वातंत्र्य : सद्यस्थिती व आव्हाने " या विषयावर सोमवार ता.५ जुलै२०२१ रोजी एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेचे उद्घाटन डी. आर. के कॉलेजचे ग्रंथपाल मा.तानाजी कांबळे यांनी केले. या कार्यशाळेत ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. अशोक चौसाळकर यांनी ' अभिव्यक्ती स्वातंत्र्य : ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व ' या विषयावर ,समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी ' अभिव्यक्ती स्वातंत्र्य: आव्हाने 'तर राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा.डॉ.अनिल पाटील यांनी ' ' 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य व न्यायालयीन दृष्टीकोण' या विषयावर मांडणी केली.तीनही वक्त्यांनी या विषयाची सखोल व अभ्यासपूर्ण मांडणी केली. या चर्चासत्राचे निमंत्रक राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए.एस. खेमणर होते.कार्यशाळेचे समन्वयक प्रा.संदीप गाडे तर अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.डॉ. जे.एस.लाड होते.कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका डॉ.हेमंत कठरे यांनी मांडली. स्वागत प्रा.संदीप गाडे यांनी केले. प्रा.मनीषा कुरणे यांनी आभार मानले.या एकदिवसीय कार्यशाळेत कोल्हापुरातील विविध महाविद्यालयांचे प्राध्यापकवृंद व विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
*ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी मंत्री सहकारमहर्षी मा.कल्लाप्पाण्णा आवाडे ( दादा )यांना नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या वतीने ग्रंथ व बुके देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या...