हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
सदरची निवड राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे युवा सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. राहुल पोवार यांनी केली. तसेच त्यांनी गाव तिथे शाखा आणि प्रत्येक घरात युवा सेनेचा कार्यकर्ता तयार करण्याचा विडाच उचलला आहे. यासाठी ते दिवस रात्र एक करून महासंघाची ताकद निर्माण करण्यासाठी अगदी तळमळीने झटत आहे. शिरोळ तालुक्यात त्यांना मानणारा मोठा युवक वर्ग आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करण्यासाठी युवक वर्ग आता सरसावला आहे. युवा सेनेच्या माध्यमातुन राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाची ताकद निश्चितच वाढणार आहे. निवडीचे पत्र महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले , राज्याध्यक्ष - प्रा. गंगाराम सातपुते सर आणि युवा सेनेचे राज्य अध्यक्ष राहुल पोवार आणि युवा सेनेचे तालुका महासचिव मलिक्कार्जुन व्यंकची आणि जयसिंगपुर शहर विभाग प्रमुख संतोष गाडीवडर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*