अप्पासाहेब भोसले हातकणंगले तालुका प्रतिनिधी :
इचलकरंजी परिसरामध्ये कामगारांच्या हितासाठी सदैव धडपडणारे निरपेक्षपणे कार्य करणारे आण्णासो पाटील यांचा सत्कार भारत निर्माण पाणीपुरवठा तारदाळ खोतवाडी कर्मचारी यांच्यावतीने करण्यात आला सत्काराच्या वेळी आपल्या मनोगतामध्ये संघटनेचे अध्यक्ष अण्णासो पाटील म्हणाले की पाणीपुरवठा कामगारांच्या पाठीशी मी व माझी संघटना ठामपणे उभे असून येणाऱ्या भविष्य काळामध्ये कामगार हितासाठी जे निर्णय घ्यावे लागतील किंवा जो लढा द्यावे लागेल त्यासाठी मी व माझी संघटना कटिबद्ध असून सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे आहे असे सांगत आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्त सत्कार केला याचे याबद्दल त्यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणुसकी फाऊंडेशनचे प्रविणभाऊ केर्ले व भारत निर्माण चे व्यवस्थापक निलेश पवार, स्वाती केर्ले ,प्रतिभा पाटील, पूनम संकपाळ, वैभव आवळे,दीलशाद देसाई,मधुकर खांडेकर ,प्रदीप भूयेकर,अक्षय चौगुले,संजय भोसले, निलेश जगदाळे,सचिन केर्ले, शोभा भगत व सर्व कामगार उपस्थित होते