हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
कोल्हापुर ग्रामीण पाणीपुरवठा कर्मचारी संघटना यांच्या वतीने भारत निर्माण पाणीपुरवठा तारदाळ खोतवाडी कामगारांच्या विविध मागण्यासाठी तारदाळचे सरपंच यशवंत वाणी व भारत निर्माणचे अध्यक्ष अशोक चौगुले यांना निवेदन कामगार संघटनेचे अध्यक्ष आण्णासो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले
तारदाळ खोतवाडी भारत निर्माण पाणीपुरवठा कामगारांच्या शिष्टमंडळाने आज कामगारांना किमान वेतन लागू करावे व आजपर्यंत फरक ही द्यावा त्याचबरोबर कामगारांचा भविष्य निर्वाह निधी संबंधित कार्यालय खाते उघडून पात्र तारखेपासून सर्वांचा फंड भरावा कामगारांच्या ग्रॅज्युटी साठी विशेष तरतूद करावी दरवर्षी कामगारांचा पगार वाढ होण्या सोबतच त्यांना बोनसही दिला जावा त्याचबरोबर कामगार वर्ग पगार अत्यंत कमी असल्याने कामगारांसाठी वैद्यकीय परिपूर्ती किंवा इ एस आय योजना लागू करावी या सर्व मागण्या कायदेशीर असून तात्काळ त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे भारत निर्माणचे काही कामगार सहा ते सात वर्षाच्या पूर्वीपासून काम करत आहेत तरीसुद्धा अद्याप त्यांना कामगार यांच्या कायद्यानुसार कोणत्याही योजना लागू नाहीत त्या त्वरित सुरू कराव्यात या मागणीसाठी कामगारांच्या वतीने निवेदन देण्यात आले
सरपंच यशवंत वाणी,ग्रामसेवक पी व्ही कांबळे, अशोक चौगुले,कामगार संघटनेचे अध्यक्ष आण्णासो पाटील,दत्ता रावल,नवीन आवळे,संजय लिगाडे कामगार निलेश पोवार,स्वाती केर्ले, प्रतिभा पाटील,पूनम सकपाळ,दिलशाद देसाई,वंदना मिरजे,वैभव आवळे,निलेश तारदाळे,मधुकर खांडेकर ,शोभा भगत,अनिता भुयेकर,प्रदीप भुयेकर,सचिन केर्ले,अक्षय चौगुले, संजय भोसले,सर्व कामगार उपस्थित होते