दत्तवाड तालुका शिरोळ परिसरात कर्नाटकातून आणून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री .



युनूस लाडखान : 

दत्तवाड-  दत्तवाड तालुका शिरोळ परिसरात कर्नाटकातून आणून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असून यातून युवकांच्या टोळ्या निर्माण झाले आहेत पोलीस व अन्न व औषध प्रशासन याकडे अर्थपूर्ण डोळेझाक करत आहे

           कर्नाटक सीमा भागातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला  गूटखा आणला जात आहे  सीमाभागातील बोरगाव सदलगा एकसंबा येथून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा वरून कोरोना काळात लाॅकडाउन असतानाही मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक सुरू आहे

           गावातील गांधी चौक, दसरा चौक, दवाखाना चौक भर चौकामध्ये राजरोसपणे गुटखा विक्री केली जात आहे कर्नाटकातून गुटका आणून देणार यांच्या टोळ्या    निर्माण झाले असून  यातून अनेक वेळा टोळीतून मारामारीही झाली आहे गावातील व्यापाऱ्यांना गुटका पोहोच करण्याचे काम हे टोळीतील युवक करत आहेत 

          यापूर्वी पोलिसांनी काही ठिकाणी कारवाई करून गुटखा पकडला आहे पण पोलीस कार्यवाही नंतरही गुटका विक्री होत असून पोलीस व अन्न व औषध प्रशासन यांनी धडक मोहीम करून प्रतिबंधित गुटका विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post