प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कै.बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट वतीने, संस्थापक अध्यक्ष मा.विक्रम शिंगाडे यांचा वाढदिवस अनेक उपक्रमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हनुन पुज्य.गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी-श्री.सिध्देश्वर सुक्षेत्रकारीमठ, हत्तरगी हे होते.तर कोल्हापुरच्या यशस्वी उद्योजक डॉ.सुमित्रा भोसले, यशस्वी उद्योजक दत्तात्रय पाटील, प्रा.डी.एन.दाभाडे,
उधोजक बाळासाहेब उदगट्टी,ह्युमन राईट्सचे प्रमुख दत्ता मांजरेकर, बी.एस.कॉलेजचे प्रिंसीपल साबन्नवर सर, बेडकिहाळ ग्रा.पंचायत चेअरमन सौ.मेघा मोहीते, नेज ग्राम पंचायत चेअरमन सौ.सुलोचना कांबळे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी मिरज, ग्राम विकास अधिकारी अशोक झेंडे आदि मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्काराने त्यांना शाल,फेटा, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. समाज रत्न, समाजभूषण, समाज गौरव, क्रिडा भुषण गौरव पुरस्कार असे एकुण 45 जनांचा गौरव करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक भाषण विक्रम शिंगाडे यांनी केले. पुज्य गुरुसिध्धेश्वर महास्वामीजी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये प्रत्येकाने आपले जीवन आनंदमयी जगले पाहिजे. आपला स्वार्थ मागे ठेवून जगल्यास त्याचे समाधान मोठे असते.ते जीवन सर्वात महत्त्वाचे असते. तेव्हा जीवन आनंदाने व हसत जगा असे मत गुरू सिध्देश्वर यांनी आशिर्वचन मध्ये म्हणाले,
कार्यक्रमाचे प्रमुख. मार्गदर्शक म्हणून प्रा.डी.एन.दाभाडे म्हणाले की समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहित व प्रेरणा देण्याचे कार्य सतत करत असतात.त्यांच्या या कार्याचा आम्ही कौतुक करतो. असे कार्य प्रत्येक गावा-गावा मध्ये असे कार्य करावे. व प्रत्येक गावात एक विक्रम तयार व्हावे असे ते म्हणाले. कोल्हापूरच्या यशस्वी उद्योजक डॉ.सुमित्रा भोसले यांनी आपल्या मनोगतामध्ये शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे ऐतिहासिक कार्य म्हनजे प्रत्येक समाजातील घटकाला अनेक प्रकारचे सेवा करत असनार्यांचे दखल घेऊन त्यांना प्रेरणा देण्याचे कार्य विक्रम शिंगाडे सतत करत असतात.त्यांचे कौतुक करेल तितकेच कमी आहे. त्यांचे प्रत्येकाने आदर्श घेण्यासारखे कार्य आहे. कारनं दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवुन समाजाला प्रेरणा देत असतात. असे त्या म्हणाल्या.
तसेच बेडकिहाळ ग्राम.पंचायत अध्यक्षा सौ.मेघा मोहीते यांनी आपल्या मनोगतमध्ये, शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य सर्वांनी प्रेरणा घेन्यासारखे आहे. मी आतापर्यंत एवढे मोठे कार्य केलेले मी कुठेच पाहीले नाही.असे त्या म्हणाल्या.
त्यावेळी सुनील फडतरे कराड, संपादक अर्जुन हजारे, दत्ता मांजरेकर, दादा पाटील, डॉ.मयुर, प्रा.साबन्नवर, शंकरदादा पाटील, ग्रा.पं.चेअरमन सुरेश खोत, माजी जि.पं सदस्य अशोक आरगे, अशोक लाखे,सुधाकर माने, सौ.रेखा कांबळे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रिती हट्टीमणी यांनी केले.
शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मा.विक्रम शिंगाडे यांच्या अनेक वर्षांपासूनचा सामाजिक कार्य केलेल्या कार्याच्या पुस्तकाचे उद्दघाटन पुज्य. गुरुसिध्देश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले.