बेडकिहाळ :
दुधगंगा-वेदगंगा पठ्यात पावसाचा जोर वाढला. तीन बंधार्यावर पाणी कारदगा-भोज पुलावर पाणी तसेच भोजवाडी, शिवापुरवाडी, कल्लोळ,बारवाड,कुन्नर पुलावर पाणी अशी ही संततधार पावसामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
बेडकिहाळ व परिसरामध्ये गेल्या 72 तासांपासून पावसाला जोर जास्त असल्यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नदी काठच्या सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असाच पाऊस जर सतत राहीला तर अनेक गावांचा संपर्क तुटन्यास वेळ लागनार नाही.