आळंदी शहर भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी सविता तापकीर

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

आळंदी : पुणे जिल्हा महिला भाजप अध्यक्षा कांचनताई कुल यांच्या आदेशाने आळंदी भाजपचे अध्यक्ष किरण येळवंडे यांनी आळंदी शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी सक्रिय कार्यकर्त्या सविता तापकीर यांची नियुक्ती घोषित केली. भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडारे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून सविता तापकीर यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पक्षसंघटन वाढीसाठी असणारी त्यांची तळमळ नजरेसमोर ठेवून पक्ष नेतृत्वाने त्यांना आळंदी शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. याबद्दल सविता तापकीर यांनी सांगितले की, मला शहराध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त करते. पक्षाचे काम यापुढेही जोमाने करून पक्षाचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम करून महिला संघटन मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सविता तापकीर यांची आळंदी शहर भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे भाजप नेते संजय घुंडरे, शहराध्यक्ष किरण येळवंडे, नगरसेवक सचिन गिलबिले, सागर भोसले, नगरसेविका सुनिता रंधवे, रुक्मिणी कांबळे, माजी नगरसेवक अशोकराव उमरगेकर, दिनेश घुले, कार्याध्यक्ष बंडुनाना काळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश जोशी, सदाशिव साखरे, राहुल घोलप, सुजीत काशिद, विकास पाचुंदे, चारुदत्त प्रसादे, गणेश निकम आदींसह पक्ष कार्यकर्ते तसेच महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post