आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांनी ताराराणी पक्ष कार्यालय , इचलकरंजी येथे वस्त्रोद्योग व IGM रूग्णालयात या विषयावर पत्रकार बांधवांनी संवाद साधला.





प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी :  आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांनी ताराराणी पक्ष कार्यालय ,  इचलकरंजी येथे वस्त्रोद्योग व IGM  रूग्णालयात या विषयावर पत्रकार बांधवांनी संवाद साधला.

पत्रकार परिषदेमधील महत्त्वाचे मुद्दे.

1) इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात.

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उभारण्यात येणार्‍या ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे काम सुरु झाले आहे, त्याचबरोबर 6 हजार लिटर क्षमतेचा अतिरिक्त लिक्विड ऑक्सिजन टँकसुध्दा उभारण्यात येणार असून अंतिम मान्यता मिळताच तेही काम लवकरच सुरु होईल.लहान मुलांसाठी 10 बेडचा अतिदक्षता विभाग सुरु करण्यासाठी स्थानिक विकास निधीतून 30 लाख रुपये दिले आहेत. परंतु रुग्णालय प्रशासनाकडून त्याबद्दल अद्याप काहीच निर्णय घेतला जात नाही.जवाहर साखर कारखान्यातर्फे रुग्णालयासाठी 25 एनआयव्ही व 10 लिटर क्षमतेचे 50 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन देण्यात येणार आहे.रुग्णालयातील 96 पदे रिक्त असली असून त्यामध्येच त्या 42 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. असे असताना काही मंडळी नको त्या मागण्या घुसडून मुख्य मागण्यांना बगल देत आहे. प्रत्येक काम मीच केले म्हणून त्यांना श्रेय घ्यायचे असेल तर त्यांनी ती खुशाल घ्यावे. पण इचलकरंजीला आरोग्य सुविधा मिळाव्यात हीच माझी अपेक्षा आहे. सीपीआर रुग्णालयात मेडीकल कॉलेज सुरु झाल्यामुळे या रुग्णालयाचा जिल्हा रुग्णालय म्हणून असलेली मान्यता रद्द झालेली आहे. त्यामुळे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा.म्हणून मी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करत आहे. परंतु त्यामध्येही काही नेतेमंडळी इचलकरंजीला जिल्ह्याचा दर्जा मिळू नये म्हणून खोडा घालत आहेत. कोल्हापूरातच आणखीन एखादे छोटेसे रुग्णालय सुरु करुन त्याला जिल्हा रुग्णालय करण्याचा या नेतेमंडळींचा प्रयत्न आहे. त्यातूनच इचलकरंजीला सातत्याने डावलले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु काही झाले तरी आपण आयजीजीएच ला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून देणारच असा विश्‍वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला.


2) वस्त्रोद्योग

गतवर्षी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अधिवेशनात 27 एचपीवरील यंत्रमागासाठी 75 पैशांची अतिरिक्त सवलत देण्याचे जाहीर केले होते. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्याचबरोबर 27 एचपी खालील यंत्रमागासाठी 1 रुपयांची अतिरिक्त सवलत प्रश्‍नी बैठक घेण्याची ग्वाही अजितदादा पवार यांनी दिली आहे. शिवाय आणि 5 टक्के व्याज अनुदानाचे दोन हजारपेक्षा अधिक अर्ज मंत्रालयात प्रलंबित असून त्यावरही निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी पाठपुरावा सुरु आहे.

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याण मंडळ स्थापनेबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. यापूर्वी 142 विकेंद्रीत कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करुन त्यामध्ये यंत्रमाग कामगाराचा समावेश केला होता. परंतु त्याला आपण विरोध दर्शवून यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापण्याची मागणी केली होती. त्या मंडळाला पूर्णविराम मिळून तत्कालीन कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळ स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी होणे बाकी असून ते लवकरात लवकर व्हावे यासाठी आपण उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, संजय केंगार, दीपक सुर्वे, नरसिंह पारीक, शंकर येसाटे, सचिन हेरवाडे आदी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post