प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त ताराराणी पक्ष कार्यालय इचलकरंजी येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या हस्ते राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. धर्मभेद, जातीभेद, अस्पृश्यता आणि निरक्षरता यांच्या विरोधात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला लढा ऐतिहासिक आहे. ही परिवर्तनाची चळवळ पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क व्हावे, असे आवाहन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी केले.
यावेळी ताराराणी पक्षअध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, प्रकाशराव सातपुते, विलास गाताडे, बाळासाहेब कलागते, एम. के. कांबळे, अहमद मुजावर, महावीर कुरुंदवाडे, चंद्रकांत इंगवले, बंडोपंत लाड, सुरेश कोल्हापूरे, विठ्ठल सुर्वे, शेखर शहा, दीपक सुर्वे, निवृत्ती गलगले, नगरसेवक राजू बोंद्रे, श्रीकांत टेके, मनु फरास, राजाराम बोंगार्डे, सर्जेराव पाटील, नरसिंह पारीक, महेश सातपुते, आर. के. पाटील, सुभाष जाधव, राजेंद्र बचाटे, रमेश पाटील, संजय कुडचे, राहुल घाट, अरुण निंबाळकर, संजय भोसकर, शांताराम लाखे, सुहास कांबळे, विजय पाटील, मोहन काळे, चंद्रकांत घाटगे, राजाराम बोंगार्डे, नारायण दुरुगडे, निरंजन आवळे, राजेंद्र आरेकर, चंद्रकांत हुल्ले, स्वप्निल पाटील,संजय नाईक, सुभाष हावळ, युवराज काळे, सिकंदर बोरगांवे, अनिल शिकलगार, जयवंत म्हेतर, फरीद मुजावर, कुमार पलंगे, महादेव पाटील, राजू माळी, हारुण पटवेगार, प्रविण केसरे, प्रकाश कांबळे, रंगा लाखे, विनायक शिंगारे, श्रीमती नंदा साळुंखे, सौ. जेवरबानु दुंडगे, सौ. सुवर्णा लाड आदींसह ताराराणी पक्षाचे पदाधिकारी, आवाडे समर्थक उपस्थित होते.